![]()
आढेगाव (ता. माढा) येथील भोंदूबाबा पांडुरंग उर्फ नानासाहेब बापू वीरकर (गुरु माऊली) आणि त्याचा भाऊ विकास वीरकर यांच्या पापाचा घडा आता भरू लागला आहे. पोलिसांनी या दोघांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली असून, तपासादरम्यान दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. गुरुवारी या प्रकरणातील फिर्यादीने भोंदूबाबाने दिलेला ”डुकराचा दात” आणि ”दगडी कासव” पोलिसांकडे जमा केले असून, या ढोंगी बाबाने सोलापूरसह पुणे, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील भक्तांना लुटून करोडोंची माया जमवल्याचे स्पष्ट होत आहे. लक्ष्मी टाकळी येथील निलेश भुईटे या तरुणाने धाडस दाखवल्याने या भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला. पैशांचा पाऊस पाडतो, आर्थिक अडचण दूर करतो आणि घरात कासव ठेवल्यास सर्व संकटे नष्ट होतात, असे सांगून या बाबाने भुईटे यांची २ लाख ३५ हजार रुपयांना फसवणूक केली होती. नरसोबाचीवाडी आणि कामाख्या देवीच्या ठिकाणी विधी करण्याच्या नावाखाली अंगारे, धुपारे, गंडे, दोरे आणि दगडी कासव देऊन भक्तांकडून भरमसाठ पैसे उकळले जात होते. या भोंदू बाबाच्या विरोधात आतापर्यंत पाच जणांनी अधिकृत तक्रारी दिल्या आहेत. अनेक भक्त बदनामीच्या भीतीपोटी अद्याप समोर आलेले नाहीत. विशेष म्हणजे, या भोंदू बाबाची बाजू मांडण्यासाठी पुणे आणि मुंबई येथील वकिलांची फौज तैनात करण्यात आली आहे.
Source link
डुकराचा दात अन् दगडी कासवांनी केली शेकडो भक्तांची फसवणूक:भोंदू गुरुमाऊलीचा कासव पॅटर्न, भुईटेकडून डुकराचा दात जप्त