![]()
राज्यातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यांत गुरुवारी प्रचंड उष्णतेची लाट होती. हवामान विभागातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार १५ मे रोजी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यासह विदर्भात उष्णता कायम राहिल. उन्हात प्रवास, ४ महिन्यांच्या चिमुकलीचा अंत नाशिक रोड | पुणे जिल्ह्यातील इंदापूर (गोथंडी) येथील शुभम सतीश काटेकर आणि प्रतीक्षा शुभम काटेकर हे दांपत्य बुधवारी सायंकाळी ४ महिन्यांच्या मुलीला घेऊन नाशिकमध्ये लग्नासाठी आले होते. इंदापूर ते नाशिक प्रवास त्यांनी खाजगी ट्रॅव्हल्सने भर दिवसा केला. या प्रवासातील उन्हाचा तडाखा या चिमुरडीला बसला. पहाटे चारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. फागणेच्या शेत मजुराचा उन्हामुळे मृत्यू धुळे | दिवसभर ४४ अंश सेल्सिअस तापमानात शेतात मजुरीचे काम केल्यानंतर सायंकाळी योगेश सीताराम पाटील (वय ४४, रा. फागणे, तालुका धुळे) यांचा मृत्यू झाला. ते मूळ धुळे तालुक्यातील कुंडाणे-वेल्हाणे येथील रहिवासी असून गेल्या काही काळापासून ते फागणे गावात वास्तव्यास होते. दरम्यान कोपरगाव तालुक्यात मीराबाई सुरेश थोरात (६२) यांचा वीज पडून मृत्यूू झाला.
Source link
उष्माघाताने नाशिक, धुळ्यात दोघांचा मृत्यू:6 जिल्ह्यात पावसाची शक्यता