![]()
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर हिंदवी स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी पराक्रम गाजवला. शंभूराजेंची कारकीर्द केवळ पराक्रमाची नसून ती अत्यंत तेजोमय आणि दिशादर्शक होती, असे गौरवद्गार प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी व्यक्त केले. येथील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्रास्ताविक डॉ. गांधी बाणायत यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. भगवान जायभाय यांनी केले. आभार डॉ. संतोष चव्हाण यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. शिवाजी यादव, डॉ. सुरेश नलावडे, डॉ. सुभाष पोटभरे, डॉ. उत्तम जाधव, डॉ. तुकाराम गावंडे, प्रा. संदीप सातोणकर, डॉ. विठ्ठल देखणे, सतीश वाघ, श्रीकांत चिंचखेडे, मुरलीधर जिने, मनोज राक्षे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज अचाट धैर्य, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेले संस्कृत पंडित प्राचार्य डॉ. कोठावळे म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांना कमी आयुष्य लाभले. या अल्पशा आयुष्यात त्यांनी नऊ वर्षे उत्कृष्टपणे राज्यकारभार केला. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तब्बल १२० लढाया लढल्या आणि विशेष म्हणजे या सर्वच्या सर्व लढाया त्यांनी जिंकून इतिहास घडवला. शंभूराजे हे केवळ युद्धकलेतच नव्हे तर अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेले संस्कृत पंडित होते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण, बुद्धी चातुर्य आणि स्वराज्यनिष्ठा अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व गाजवले, असेही त्यांनी नमूद केले.
Source link
शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये व्याख्यानासह विविध कार्यक्रम:छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय- प्राचार्य कोठावळे