Headlines

पिंपळगाव पेठ येथे अवैधरीत्या वाळू उपसा; पाणीपुरवठा विहिरीला धोका:वाळू उपसा तत्काळ बंद करा, अन्यथा तहसीलसमोर उपोषण करू- सरपंच‎




सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विहिरीजवळच अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वाळू माफियांनी तब्बल ३० फूट खोल खड्डे खोदले आहेत. त्यामुळे गावाच्या पाणीपुरवठा विहिरीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. भविष्यात विहीर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत गावकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. तात्काळ वाळू उपसा बंद करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावातील अनेक नागरिकांचे जीवन या विहिरीवर अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच पाण्याची टंचाई जाणवत आहे. वाळू माफियांच्या बेकायदेशीर उत्खननामुळे विहिरीची पाणीसाठवण क्षमता धोक्यात आली आहे. मोठमोठ्या मशीनच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी वाळू उपसा करण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे गावातील महिलांमध्येही भीतीचे वातावरण आहे. आज विहिरीला धोका निर्माण झाला आहे. उद्या गाव पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया सुमनबाई यांनी दिली. ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करावा. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण : गावाच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ करण्यात आलेल्या खोल वाळू उत्खननामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीकडेही नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. पाणीपुरवठा ही गावाची अत्यंत महत्त्वाची बाब आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करावी. अवैध वाळू उपसा थांबवावा. ही ग्रामपंचायतीची भूमिका आहे, अशी माहिती पिंपळगाव पेठचे ग्रामसेवक अशोक महाकाळ यांनी दिली. पिंपळगाव पेठ येथे अवैधरीत्या वाळू उपशामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर कोसळू शकते. विहिरीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न गावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे विहिरीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात गावावर पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते. ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संबंधित वाळू माफियांवर कठोर गुन्हे दाखल करावेत. उत्खनन पूर्णपणे बंद करण्यात यावे. अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच दिलीप जाधव यांनी दिला. पंचनामा करून दोषींवर कठोर कारवाई करू ^पिंपळगाव पेठ येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित ठिकाणाची महसूल विभागामार्फत पाहणी करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा केलेल्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला आहे. संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. गावाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होणार नाही. यासाठी प्रशासन आवश्यक ती पावले उचलेल. – दीपक बागुल, ग्रामहसूल अधिकारी पिंप्री (व) सज्जा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *