Headlines

कांद्याला मातीमोल भाव, रस्त्यावर टाकून निषेध:प्रतिकिलो एक रुपया ते 11 रुपयांचा भाव, शेतकऱ्यांचा आंदोलनात संताप‎




मशागत, खते, किटकनाशक तसेच मजुरी याचा खर्च वाढता असला, तरी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याला मात्र मागील चार ते पाच वर्षांत काही दिवसांचा अपवाद वगळता समाधानकारक भाव मिळाला नाही. वाढलेला उत्पादन खर्च व तुलनेत घसरत असलेले बाजारभाव यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यापार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग अडवून, रस्त्यावर कांदा ओतला. सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते, नांदूर पठारचे सरपंच रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र महामार्गावर होते. कांद्याला सध्या अत्यंत कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची उर्वरित पान ४ आंदोलनात माणुसकीचे दर्शन अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कल्याणकडून अहिल्यानगरच्या दिशेने एक रुग्णवाहिका रोरावत येताना दिसली. त्यावेळी तत्काळ रुग्णवाहिकेला मार्ग करून आंदोलनस्थळी माणुसकीचे दर्शन घडवले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *