Headlines

फुलंब्रीत सर्वपक्षीय नेत्यांची दिलजमाई:आमदार सत्तारांचा नगराध्यक्ष ठोंबरेंच्या खांद्यावर हात‎




शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत अंतर्गत मंजूर विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ शनिवारी पार पडला. मात्र, या कार्यक्रमात रंगलेल्या रंगतदार राजकीय सोहळ्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातील परस्परांचे कट्टर विरोधक समजले जाणारे दिग्गज नेते एकाच मंचावर एकत्र आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सर्वपक्षीय ‘दिलजमाई’मागे काही नवीन राजकीय समीकरणे तर शिजत नाही ना, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. फुलंब्रीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्याला खासदार कल्याण काळे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार अंबादास दानवे आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर रंगलेला या नेत्यांमधील सुसंवाद आणि एकमेकांना दिलेली साथ पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. आमदार सत्तार यांच्या निधीतून ७ ठिकाणच्या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अब्दुल सत्तार यांनी भरमंचावर नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या खांद्यावर अत्यंत आपुलकीने हात ठेवत, “फुलंब्री नगरपंचायतीचा विकास करण्यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही,’ अशी ग्वाही दिली. तसेच खासदार कल्याण काळे आपल्यासोबत असल्याने आता फुलंब्री तालुक्याचा विकास आणखी वेगाने होईल, असा विश्वासही व्यक्त केला. अब्दुल सत्तार आणि राजेंद्र ठोंबरे यांच्यातील ही जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर सगीर पठाण, अर्चना दुतोंडे, राणी घोडके, मसरत जफर चिस्ती, सुशमेश राजू प्रधान, सना उमर पटेल यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. आठ महिन्यापूर्वी अब्दुल सत्तार यांना अंबादास दानवे यांनी हिरवा साप म्हटले होते. त्यामुळे या कार्यक्रमास दोन्हीही नेते एकाच मंचावर आल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील अशी अपेक्षा होती. मात्र, दोन्ही नेत्यांनी टिका करणे टाळले आहे. तसेच ठोंबरे यांची महिनाभरापूर्वी ते शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता सत्तारांनी त्यांच्या खांद्यावर हात टाकल्याने या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. दानवेंनी हिरवा साप म्हणून केली होती टीका



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *