Headlines

श्री अगस्ति ऋषी आश्रमात उद्यापासून महिनाभर अधिकमास कीर्तन महोत्सव:ग्रंथपारायण, अन्नदान‎आणि दिग्गज‎कीर्तनकारांची मांदियाळी‎



अकोले तालुक्याचे आराध्यदैवत श्री अगस्ति ऋषी आश्रमात वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार रविवारपासून (१७ मे) पुरुषोत्तम (अधिक) मासानिमित्त अखंड महिनाभर कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.के.डी.धुमाळ यांनी

.

महोत्सवाचा शुभारंभ रविवारी सकाळी ८:३० वाजता आमदार डॉ. किरण लहामटे, हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, ज्येष्ठ विश्वस्त बद्रिनाथशेठ मुंदडा व अध्यक्ष धुमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहणाने होईल. महिनाभर ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत आणि ‘अगस्त्य महात्म्य’ ग्रंथांचे पारायण केले जाईल. महोत्सवात स्वामी गोविंददेव गिरीजी, इंदोरीकर महाराज, देविदास महाराज म्हस्के यांच्यासह अनेक दिग्गजांची कीर्तने होतील. सांगता उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. या धार्मिक सोहळ्यासोबतच देवस्थानने सामाजिक बांधिलकी जपत ३१ मे व १ जून रोजी दुग्ध व्यावसायिक व शेतकऱ्यांसाठी “कृषी मार्गदर्शन शिबिर’ आयोजित केले आहे. यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ ऊस व डाळिंब व्यवस्थापनावर मार्गदर्शन करतील. तसेच २७ मे रोजी मोफत नेत्ररोग व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी दोन हजार आसनक्षमतेचा वॉटरप्रूफ मंडप व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

वर्षभर उपक्रमांची मांदियाळी धार्मिक परंपरेनुसार अगस्ति आश्रमात महाशिवरात्री उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह आणि कुस्त्यांचा हगामा रंगतो. याशिवाय सामाजिक बांधिलकीतून देवस्थानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा, गोशाळा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, बालसंस्कार शिबिर आणि वारकरी गुरुकुल यांसारखे समाजोपयोगी उपक्रम वर्षभर राबविले जातात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *