![]()
संतभूमी नेवासा येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या “ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळ्या’चा अखेर राज्य शासनाच्या अधिकृत पालखी सोहळ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ऐतिहासिक शासनमान्यतेमुळे यंदाच्या पालखी सोहळ्याचे संपूर्ण रूप पा
.
मागील वर्षी सुरु झालेल्या या सोहळ्यात पहिल्याच वर्षी २७ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. मार्गावर त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराज आणि आळंदीची ज्ञानोबा माऊलींच्या पालखीची झालेली ऐतिहासिक भेट वारकरी विश्वाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. यंदा सोहळ्यातील दिंड्यांची संख्या ३२ वर पोहोचली असून, शासनमान्यता मिळाल्याने हा सोहळा आता अधिक भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे. “ज्ञानेश्वरीचा महिमा आता शासकीय वैभवातून जगभर पोहोचेल,” अशी भावना भक्तांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या मान्यतेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे महंत देविदास महाराज म्हस्के, श्रीराम महाराज झिंजुर्के, ज्येष्ठ कीर्तनकार रामभाऊ महाराज राऊत यांच्यासह आमदार मोनिकाताई राजळे व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीला आणि आमदार राजळे यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्याला यश आले आहे.
शासनमान्यतेनंतर पालखीत होणारे ५ मोठे बदल १) मुबलक निधी : स्वच्छता व फिरत्या शौचालयांसाठी ७ लाख, तर आरोग्य सुविधांसाठी ५ लाख रुपयांचा शासकीय निधी थेट मंजूर. २) मोबाईल टॉयलेट्स : पालखी तळ व विसाव्याच्या ठिकाणी वारकरी माता-भगिनींसाठी १०० मोबाईल टॉयलेटची आधुनिक सुविधा. ३) पाणी व आरोग्य : पालखी मार्गावर टँकरद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी, रुग्णवाहिका, फिरती वैद्यकीय केंद्रे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची आरोग्य शिबिरे. ४) पायाभूत सुविधा : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची दुरुस्ती, विसाव्याच्या ठिकाणी स्वच्छता व महामार्गावर विद्युत रोषणाई. ५) सुरक्षा कवच : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र वाहतूक आराखडा आणि चोख पोलीस बंदोबस्त.