Headlines

दुहेरी मार्गावरून 1 जूनपासून प्रथमच 110किमीच्या वेगाने धावणार 27 रेल्वे:30 मे ला विसापूर ते सारोळादरम्यान होणार शेवटची चाचणी; प्रवाशांचा वाचणार वेळ‎


.

दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आता टप्प्यात पोहोचले आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सोमवारी (१८ मे) अकोळनेर ते निंबळक या विभागातील १८.२१ किमी अंतरावर ताशी १३० किमी या वेगाने हायस्पीड इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर ३० मे रोजी या रेल्वे दुहेरीकरणाचा अंतिम टप्पा असलेल्या विसापूर ते सारोळा दरम्यान १६ किमी अंतरावर रेल्वेची शेवटची चाचणी होईल. २ हजार कोटी खर्चून तयार केलेल्या या २३६ किमीच्या दुहेरी मार्गावर १ जूनपासून प्रथमच अहिल्यानगर स्थानकातून दौंड ते मनमाडदरम्यान २७ प्रवासी रेल्वे गाड्या अधिक वेगाने धावणार आहेत.

यापूर्वी क्रॉसिंगवर जात असलेल्या वेळेमुळे अहिल्यानगरहून मनमाडला जाण्यासाठी १८० मिनिटे (३ तासांचा) कालावधी लागायचा, आता तो कालावधी कमी होऊन १२० (२ तासांवर) येणार आहे. तर अहिल्यानगरहून दौंडला उर्वरित पान ४ { एकूण पूल : ५

दक्षिण-उत्तर भारतातील तीर्थक्षेत्रांशी होणार कनेक्ट दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच गेल्या वर्षभरात हंगामी सुरू असलेल्या ३ गाड्या नियमित करण्यात आल्या. रिवा-पुणे, पुणे-वाराणसी या नव्याने गाड्या सुरू झाल्या. यापूर्वी अहिल्यानगर रेल्वे स्थानकातून २२ रेल्वे धावत होत्या, आता ती संख्या २७ झाली आहे. विशेष करून उत्तर-दक्षिण भारताची तीर्थस्थळे या रेल्वेने कनेक्ट झाली असून, भविष्यात शिर्डी ते पुणतांबा हा दुहेरी मार्ग झाल्यानंतर दक्षिण-उत्तर भारतातील तीर्थक्षेत्रे शिर्डीशी कनेक्ट होणार आहेत.

विनाथांबा ताशी ११० किमी वेगाने धावणार रेल्वे मनमाड ते दौंड हा मार्ग संपूर्ण उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा मुख्य दुवा मानला जातो. हा संपूर्ण मार्ग दुहेरी होत असल्याने रेल्वे गाड्या विनाथांबा ताशी ११० ते १२० किमी वेगाने धावू शकतील. यापूर्वी सरासरी वेग हा ताशी ५० ते ६० किमी होता.

क्रॉसिंगवर थांबवण्याची आवश्यकता भासणार नाही ^”मनमाड-दौंड रेल्वेचे शेवटच्या टप्प्यातील काम हे विसापूर ते सारोळा असून, ते काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. ३० मे ला या मार्गावरील शेवटचा टप्पा असलेल्या मार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणी होणार आहे. त्यानंतर १ जूनपासून या दुहेरीमार्गावर पूर्ण क्षमतेने रेल्वे धावणार आहेत. मनमाड ते दौंड दरम्यान सर्वाधिक अंतर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. या दुहेरी मार्गावर रेल्वेंना क्रॉसिंगवर थांबवण्याची आवश्यकता भासणार नाही.” – आर.डी. सिंग, प्रकल्प अभियंता



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *