Headlines

कुमकुमची आंतरराष्ट्रीयस्तरावर सुवर्ण झेप:वर्ल्ड आर्चरी स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने वाजवला डंका‎




चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण विजेत्या महिला संघात येथील मणीबाई गुजराती हायस्कुलच्या कुमकुम अनिल मोहोडचाही समावेश आहे. कुमकुमच्या या उल्लेखनीय यशामुळे अमरावती शहरासह शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुमकुम मोहोड ही मणीबाई गुजराती हायस्कूल आणि जुनियर कॉलेजमधील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक संपादन करून शाळेचे, अमरावतीचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. कुमकुमच्या या सुवर्ण यशामागे तिचे आई-वडीलांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन व पाठबळ महत्वाचे ठरले आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देव यांनी तिचे अभिनंदन करत तिच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेतील आर्चरी प्रशिक्षिका स्वाती बाळापुरे यांनी कुमकुमच्या मेहनतीचे व समर्पणाचे कौतुक केले.कुमकुम मोहोड हिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे शाळेसह अमरावती विभागात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. दि. गुजराती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुरेशभाई राजा यांनी समस्त कार्यकारिणीच्यावतीने तिच्या या सुवर्ण झेपेसाठी अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा मंत्र्यांकडून मुख्याध्यापिकेस पत्र भारतीय महिला रिकर्व्ह संघाच्या या सुवर्ण यशामुळे देशाच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून कुमकुम मोहोड हिने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा सुवर्णमुकुट खोवल्यामुळे तिचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत् दादा भूसे यांनी शिक्षण विभागाच्यावतीने शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देव यांचे अभिनंदन केले व कुमकुमच्या भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *