Headlines

श्री शिवाई देवी संस्थानला तीर्थक्षेत्र विकासाचा दर्जा:जिल्हा परिषद सीईओंच्या प्रस्तावास मिळाली मंजुरी‎




प्रतिनिधी । सिल्लोड/ शिवना अवघ्या तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील ग्रामदैवत आई श्री. शिवाई देवी संस्थानला आता शासनातर्फे तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तीर्थस्थळाचा “क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संस्थानतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री संजय शिरसाठ, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, भोकरदनचे आमदार संतोष दानवे तसेच भाजप- सेनेच्या स्थानिक पुढाऱ्यांनी या प्रस्तावाची शिफारस केली होती. ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा उपवन संरक्षक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने हा प्रस्ताव परिपूर्ण करण्यासाठी प्रशासकीय प्रकिया पूर्ण केली होती. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रस्तावास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या कामासाठी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वपक्षीय पदाधिकारी, अधिकारी व नेत्यांचे श्री. शिवाई देवी संस्थानच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. शिवाई देवी मंदिरासोबतच नृसिंह मंदिर हस्ता (कन्नड), साई वृंदावन धाम गांधेली, विठ्ठल रुक्मिणी मंदिर वडाळी व बालाजी मंदिर लखामपूर (गंगापूर), वीरभद्र मंदिर आगरसायगाव व ओमकारेश्वर महादेव मंदिर पानवी (ता. वैजापूर) या मंदिरांनाही तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. सिल्लोडसह परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत म्हणून श्री शिवाई देवस्थानची ओळख आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *