Headlines

सिल्लोड 360, फुलंब्रीत 82 मेडिकलचा संप:पैठण, कन्नड, पाचोड, सोयगावमधील औषध विक्रेत्यांनीही नोंदवला संपात सहभाग‎



ऑनलाइन औषध विक्रीविरोधात तसेच औषध व्यवसायातील विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री, कन्नड, वैजापूर, गंगापूर, पाचोड, सोयगावमधील औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. सिल्लोड येथे औषध विक्रेत्यांनी तहसील कार्यालयावर मूक मो

.

पैठण येथील संपात सुनील देशमुख, योगेश लोहिया, शिवकांत नवथर, आनंद थोरात, पवन लोहिया, उमेश तट्टू, कुणाल खताडे, सुनील नलभे, जुगलकिशोर लोहिया, सचिन लखोटिया सहभागी होते.तर कन्नड येथे संजय शहापूरकर, दिनेश पंडित, नितीन चव्हाण, अनिकेत सोनवणे, मयूर राऊत, रवींद्र जाधव, परवेझ देशमुख, मंजूर पटेल सहभागी होेते. फुलंब्री शहरासह ग्रामीण भागामध्ये ८५ मेडिकल असून तालुक्यात तीन मेडिकल अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष मधुकर तावडे यांनी सांगितले. सिल्लोड तालुक्यातील ३६० औषध दुकानदार बंदमध्ये सहभागी झाले होते. तहसीलदार अंकिता ताकभाते यांना निवेदन देण्यात आले. सोयगाव येथेही सर्व औषध दुकाने बंद होती. यावेळी संजय शहापूरकर, दिनेश पंडित, नितीन चव्हाण उपस्थित होते. पाचोडला बंदमध्ये विकास हजारे, चेतन पांडे, राजू शेट्टी, तुषार नरवडे, हनुमान गोर्डे, चत्रभुज काळे, रंजीत जगताप, ओम भांगाळ, राम पवार सहभागी होते.

फुलंब्रीत अत्यावश्यक सेवेस ३ औषधी दुकाने होती सुरू



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *