Headlines

‘फुलशिवरा'' गावाने घडवले 7 पीएसआय‎:सख्ख्या भावांची उपनिरीक्षकपदी निवड, युवकांना गावातच मिळतेय प्रशिक्षण




मकसूद शेख | लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा गावाने ‘पोलिसांचे गाव’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. अवघी १८०० लोकसंख्या असलेल्या या गावातील आजमितीस ७ पोलिस उपनिरीक्षक आणि ४९ पोलिस कार्यरत आहेत. गावाची ही ख्याती वसुसायगाव येथील भाऊसाहेब गर्जे यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाली आहे. दरम्यान, यंदा पोलिस दलात भरती झालेल्या व उपनिरीक्षपदी निवड झालेल्यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. वसूसायगाव येथे ८५ टक्के शेतकरी आणि १५ टक्के व्यापारी व इतर वर्ग असलेल्या या गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंतची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एक किलोमीटर अंतरावरील गाजगाव येथील श्री गणेश विद्यालयात जावे लागते. गावातील राहुल रावते आणि गोपाळ रावते या दोन सख्ख्या भावांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. या अभूतपूर्व यशामुळे गावात त्यांच्या नागरी सन्मान सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर करण्यात आले होते. फुलशिवरा येथे दीर्घकाळापासून टेलरिंगचे काम करणारे रामू टेलर यांची मुलगी २०१५ मध्ये गावातून प्रथमच पोलिस दलात भरती झाली. आपल्या बहिणीची हीच प्रेरणा घेऊन राहुल रावते आणि गोपाळ रावते हे दोघे भाऊदेखील पोलिस दलात दाखल झाले. कार्यरत असतानाच या दोन्ही भावांनी आपला अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर कठोर मेहनतीच्या बळावर या दोन्ही सख्ख्या भावांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवून पीएसआय पदाला गवसणी घातली. केवळ तरुणच नव्हे, तर फुलशिवरा गावातील मुलींनीही खाकी वर्दीत आपले नाव कोरले आहे. गावातील एकूण ५६ पोलिस कर्मचाऱ्यांपैकी ३ महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी देशसेवेत आपले कर्तव्य बजावत आहेत. हा अत्यंत कौतुकास्पद संदेश आहे. वसूसायगाव येथे पोलिस भरतीची तयारी करणारे युवक. तरुणांनो, भावनांचा समतोल राखा Ãबुद्धिमत्तेला जोपर्यंत योग्य प्रशिक्षणाची जोड मिळत नाही, तोपर्यंत मोठे यश संपादन करता येत नाही. करिअरच्या काळात तरुणांनी अनावश्यक समारंभ साजरे करणे टाळावे. स्वतःच्या मनावर ताबा मिळवून आणि भावनांचा समतोल राखून कुटुंबात आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. – भाऊसाहेब गर्जे,वसुसायगाव, प्रशिक्षक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *