![]()
ऑनलाइन औषध विक्री आणि ई-पोर्टल्सच्या मनमानी कारभाराविरोधात अहिल्यानगर जिल्हा आणि शहरातील औषध विक्रेत्यांनी बुधवार (२० मे) रोजी कडकडीत बंद पाळला. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार, अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा बंद पुकारला होता. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल ८ हजार ३०० लहान-मोठ्या औषध विक्रेत्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवत आपली दुकाने बंद ठेवली. या आंदोलनादरम्यान केमिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ऑनलाइन औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध व्यवसाय धोक्यात आला असून, नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. केंद्राने २८ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर केलेले जीएसआर ८१७ (इ) आणि कोविड काळातील २६ मार्च २०२० चे जीएसआर २२० (इ) हे जाचक नियम मागे घेण्यात यावेत, ही मुख्य मागणी आहे. या संदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्राची प्रतही प्रशासनाला जोडण्यात आली आहे.
Source link
जिल्ह्यातील 8300 मेडिकल शटर राहिले बंद:ऑनलाइन औषध विक्री विरोधात केमिस्ट, ड्रगिस्ट असोसिएशनचा संप, जिल्ह्यात प्रतिसाद