Headlines

वाळू माफियांनी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून थेट पाणी सोडले:महर्षी वाल्मीक संघाने आंदोलनाचा दिला इशारा‎




पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफिया मुजोर झाले असून, त्यांनी चक्क चंद्रभागा नदीचे पाणी वाहून जावे आणि उघड्या पडलेल्या पात्रातून वाळू चोरी करता यावी यासाठी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून टाकल्या प्रकरणी वाळू माफियांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सध्या अधिक मास सुरू असल्याने पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. विष्णुपद बंधाऱ्यात पाणी साठवण केल्यामुळे भाविकांना स्नानासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. मात्र, बंधाऱ्यात पाणी साठवल्याने वाळू उपसा करणे वाळू माफियांना अडचणीचे ठरत होते. यामुळे नदीपात्रात साठलेले पाणी वाहून जात आहे. येथे येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध होणार नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी आणि दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. कायदेशीर कारवाई करा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *