![]()
पातूर तालुक्यातील सावरगाव तांडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वीज समस्यांमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी संतप्त झाले असून विविध मागण्यांसाठी नागरिकांनी शुक्रवारी भर उन्हात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आणखी
.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठ्याची समस्या आहे. डीपीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून सोमवारी झालेल्या खरीप नियोजन आढावा बैठकतही लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान आता तर ग्रामस्थांनी थेट उर्वरित पान ४ पातूर, सावरगाव विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघात येत असून, हा मतदारसंघ शिवसेनेच्या (उबाठा) ताब्यात आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात निधी देण्यात येत नाही, असा आरोप नेहमीच होतो. आता विद्युत पुरवठ्याशी संबंधित समस्यांबाबतही तेच होत आहे. या राजकीय रस्सीखेचचा फटका मात्र ग्रामस्थांना बसत आहे.
राजकीय रस्सीखेच ग्रामस्थांच्या आलीय मुळावर