Headlines

संविधान समता दिंडीत सहभागी व्हा; वारकरी संप्रदायतर्फे आवाहन:सामाजिक संस्था संघटनांतर्फे भक्ती संगम कार्यक्रम उत्साहात‎




प्रतिनिधी |अकोला संविधानाची स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय ही मूल्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान समता दिंडी काढली जाते. या दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन संविधान समता दिंडीचे मुख्य संवादक हभप शामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले. ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्था रणपिसे नगर अकोला येथे आयोजित भक्ती संगम कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रम सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने पार पडला. कार्यक्रमाला प्रामुख्याने ह.भ. प. विजयराज शिंदे महाराज वाशीम, शिक्षण संस्था संचालक मंडळाचे विभागीय सचिव विजय कौसल यांची प्रमुख उपस्थिती होती. वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना संविधानाची भाषा आणि संतांचे विचार समता, बंधूता यांची सांगड घालून सोप्या भाषेत माहिती दिली जाते. महात्मा ज्योतिबा फुले वाडा पुणे येथून दिंडीची सुरुवात होते. जोपर्यंत समाजात जातिभेद, लिंगभेद आणि विषमता आहे, तोपर्यंत संविधानाच्या मूल्यांचा प्रचार करण्यासाठी संविधान समता दिंडीची गरज असल्याचे प्रतिपादन श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले. कार्यक्रमाला जागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास वखरे, दिनेश काठोके आगर, रघुवीर रुचके, श्रीकृष्ण माळी, समाजसेवक गजानन हरणे, साने गुरुजी शिक्षक संघटनेचे ज्ञानेश्वर मांडेकर, सविता शेळके, संगीता नवले, महेंद्र पाटील, सोमेश्वर चौधरी, रोहित तारकस, गजानन प्रभाकरराव देशमुख, श्रीकृष्ण विखे पाटील यांचेसह श्री गुरुदेव सेवा मंडळ, सर्वोदय मंडळ, निसगोपचार संस्था, नशाबंदी मंडळ व विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. जातीभेदाला थारा नाही वारकरी संप्रदाय हा सर्व समावेशक आहे. येथे जाती भेदाला थारा नाही. संत परंपरेचा हा वारसा समृद्ध करण्यासाठी संविधान समता दिंडीत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन वाशीम येथील ह. भ. प. विजयराज शिंदे महाराज यांनी याप्रसंगी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *