![]()
राज्यभरात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर
.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या शिबिरामध्ये पंचगव्हाण आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचाराची सुविधा मिळावी, हा या शिबिरामागचा मुख्य उद्देश होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गट प्रवर्तक किरण बावस्कर, आरोग्य सहाय्यक साहेबराव रावणकर, आरोग्य सेविका गायकवाड, आरोग्य सेवक, गावातील सर्व आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. या मोफत आरोग्य शिबिरामुळे परिसरातील गरीब व गरजू रुग्णांची मोठी सोय झाली आहे. ग्रामस्थांनी आरोग्य विभागाचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
अत्याधुनिक सेवांचा लाभ विशेष शिबिरामध्ये नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने दंत चिकित्सा: दातांचे विविध आजार, हिरड्यांच्या समस्या आणि त्यावरील मोफत उपचार करण्यात आले. तसेच दृष्टिदोष तपासणी करुन मोफत आरोग्य सल्ला देण्यात आला. तसेच हृदयरोगाची तपासणी करण्यात आली. यासाठी आवश्यक रुग्णांची मोफत ई.सी.जी. तपासणी करण्यात आली. तसेच रक्तदाब, मधुमेह आणि इतर प्राथमिक आजारांचे निदान करण्यात आले आणि मोफत ओषधे देण्यात आली.