- Marathi News
- National
- Mystery Of Twisha Sharma’s Death, Retired Judge Gajaad, Those 7 Big Suspicions, Due To Which Mother in law And Husband Were Hanged
भोपाळ3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

नोएडा निवासी ३३ वर्षीय माजी मॉडेल ट्विशाच्या भोपाळस्थित सासरी १२ मे रोजी झालेल्या मृत्यूच्या १५ दिवसांनंतर तिची सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांना अटक झाली आहे. सीबीआयचे पथक गुरुवारी सकाळी ११:३० वाजता भोपाळच्या बाग मुगालिया एक्सटेन्शनस्थित गिरिबाला यांच्या निवासस्थानी पोहोचले. येथे ८ तास चौकशी केली. सायंकाळी ५ ते साडेपाचच्या दरम्यान गिरिबाला यांना अटक करून रात्री ८ वाजता चार इमली येथील सीबीआय कार्यालयात नेले.
सूत्रांनुसार, न्यायालयाची वेळ संपल्यामुळे गुरुवारी गिरिबाला यांना न्यायालयात हजर करता आले नाही. मात्र, सीबीआयने विशेष न्यायाधीशांच्या बंगल्यावर अटकेची माहिती पाठवली. आता शुक्रवारी त्यांना कोर्टात हजर केले जाईल. बुधवारी मध्यरात्री १ च्या सुमारास मध्य प्रदेश हायकोर्टाने गिरिबाला यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे आदेश दिला. त्यात कोर्ट म्हणाले, गिरिबाला यांची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे. या आदेशाच्या काही तासांत गिरिबाला यांना अटक झाली.
आता समोरासमोर चौकशीची तयारी
ट्विशाचा पती समर्थला सीबीआयने आधीच कोठडीत घेतले. आता समर्थ व गिरिबाला यांना समोरासमोर बसवून चौकशी होईल.
1. शरीरावर जखमा
शवविच्छेदन अहवाल मोठा टर्निंग पॉइंट ठरला. ट्विशाच्या शरीरावर फासाव्यतिरिक्त ६ दुखापती होत्या- चार डाव्या हातावर, १ अनामिका बोटावर, एक डोक्यावर. त्या फासावरून उतरवताना झालेल्या नाहीत.
2. ट्विशाचे व्हॉट्सॲप मेसेज
ट्विशाने मृत्यूपूर्वी माहेरच्यांना व्हॉट्सॲप संदेश पाठवले होते. ते तपासात महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे बनले. त्यात ट्विशाने पती समर्थवरच नाही, तर आपल्या सासूवरही गंभीर आरोप लावले होते.
3. व्हायरल फुटेजवर प्रश्न
गिरिबाला या निवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत. सायबर क्राईम, सायबर फॉरेन्सिक, यांसारखे कोर्स त्यांनी केले आहेत. त्या प्रभाव टाकू शकतात. सीसीटीव्ही फुटेज जप्त होऊनही ते व्हायरल झाले.
4. प्रभावाचा वापर केला
एफआयआर नोंदवल्यानंतर १५ मे रोजी भोपाळच्या सत्र न्यायालयाने २४ तासांत गिरिबाला यांना अटकपूर्व जामीन दिला होता. हायकोर्टाने सुनावणीदरम्यान एसजींनी यावर तीव्र आक्षेप घेतला होता.
5. मुलाखतीत आरोप
जामिनावर बाहेर असताना गिरिबाला यांनी अनेक मीडिया चॅनेल्सना मुलाखती दिल्या. त्यात त्या कथितरीत्या ट्विशाचे उपचार, मानसिक स्थितीवर प्रश्न करत होत्या. पीडितेच्या चारित्र्यावरही लांच्छण लावले.
6. पतीची शरणागती नाही
पती समर्थने हायकोर्टाकडे अटकेपासून संरक्षण मागितले होते. पण दिलासा न मिळाल्याने २२ मे रोजी याचिका मागे घेतली. पती व सासूच्या जबाबांमध्येही तपासादरम्यान अनेक विरोधाभास आढळले.
7. सुमारे ~२० लाखांचे शेअर्स नावावर करण्यासाठी दबाव टाकत होते आई-मुलगा; ट्विशाने आईला सांगितले होते- हुंड्यासाठी झटापटही
अली अख्तर. भोपाळ | निवृत्त जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंह यांची सून ट्विशाच्या मृत्यू प्रकरणात नवी माहिती उजेडात आली. तपासानुसार ट्विशाने अनेक कंपन्यांचे सुमारे २० लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. हेच शेअर्स आपल्या नावावर करण्यासाठी पती समर्थ आणि सासू गिरीबाला सिंह तिच्यावर दबाव टाकत असत. दोघेही तिचा सतत छळही करत होते. ॲडव्होकेट अंकुर पांडे यांच्या मते, लग्नाच्या वेळी या शेअर्सची किंमत सुमारे २० लाख रुपये होती. लग्नानंतर ट्विशा व्हिएतनामला गेली होती.
तेथून परतल्यानंतर समर्थ आणि गिरीबाला सिंह यांना तिच्या नावावर शेअर्स असल्याची माहिती मिळाली. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान ॲडव्होकेट जनरल यांनीही या तथ्याचा उल्लेख केला होता. त्यांना न्यायालयाने रेकॉर्डवर घेतले. तपासात हेही समोर आले आहे की, ट्विशाने आपल्या आईला फोनवर सांगितले होते की समर्थ आणि गिरीबाला सिंह हुंड्याच्या मागणीवरून तिच्याशी झटापटही करतात. दोघेही मुलावरूनही तिचा मानसिक छळ करत होते. छळाला कंटाळून ट्विशा १९ एप्रिल रोजी राजस्थानला गेली होती.