Headlines

जांबमध्ये लोकसहभागातून 10 हजार वृक्षलागवडीचा संकल्प:शाश्वत पाण्यासाठी आळाचीवाडी पुरंदर, सातारा, चंद्रपूर, गावांच्या अभ्यासातून करणार जलसंधारणाची कामे‎



जिल्ह्यातील जांब गावाला हरित करण्यासह पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी अमोल घायवट यांच्या पुढाकारातून पावसाळ्यात १० हजार झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. गत तीन वर्षात अकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करणाऱ्या अमोल घायवट यांनी

.

गतवर्षी त्यांच्या माध्यमातून अकोट तालुक्यात ४९ गावे आणि ६७ शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, अनेक ठिकाणी योग्य संगोपन न झाल्याने केवळ २५% झाडेच जगली. त्यामुळे श्रम आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा, केवळ जांब गावातच काम करून ८० ते ९० टक्के झाडे जगवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मोहिमेतंर्गत जांब गावातील सुमारे ४०० घरांमध्ये प्रत्येकी ३ झाडे दिली जाणार आहेत. ग्रामस्थांची मागणी व आवडीनुसार त्यांना कडुलिंब, सीताफळ, डाळिंब, बदाम आणि चिकू आदी फळझाडे पुरवली जातील, फळांच्या अपेक्षेने विद्यार्थी व ग्रामस्थ झाडांची आपुलकीने काळजी घेतील. झाडांच्या सुरक्षिततेसाठी “ट्री गार्ड’ दिले जाणार असून, सलग तीन ते पाच वर्षे झाडांचे उत्तम संगोपन करणाऱ्या कुटुंबांना बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. गावात भरपूर ऑक्सिजन व सावली मिळावी, यासाठी प्रत्येकाच्या दारात किमान एक कडुलिंबाचे झाड लावण्याचा संकल्प आहे.

जलसंधारणातून अर्थकारण, स्थानिक रोजगार निर्मिती २०२२ मधील पाणी फाउंडेशनच्या कामातून प्रेरणा घेत घायवट यांनी वाहून जाणारे पावसाचे पाणी गावातच अडवून जिरवण्याचा ध्यास घेतला आहे. यामुळे बारमाही शेती शक्य होऊन गावाचे उत्पन्न वाढेल, असा त्यांचा विश्वास आहे. तसेच जलसंधारण कामातून गावातील २०-२५ बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे घायवट यांचे नियोजन आहे. यासाठी त्यांनी आळाचीवाडी (पुरंदर) आणि सातारा (चंद्रपूर) या गावांना भेटी दिल्या असून तेथील अर्थकारण व जीवनमान उंचावल्याचे त्यांनी पाहिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *