Headlines

सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत:म्हणाल्या- रिश्ते मायने रखते है, संपूर्ण कुटुंब वहिनींच्या पाठीशी




बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. रिश्ते मायने रखते है, असे म्हणत त्यांनी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. पैसा आणि सत्ता यापेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे असतात, असे सांगताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराबाबतही सूचक भूमिका मांडली आहे. त्यामुळे बारामतीतील राजकारणात वेगळाच रंग भरला आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला जाणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर देण्याऐवजी वेगळाच दृष्टिकोन मांडला. हा प्रश्न अजित पवार गटाने विचारायला हवा, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले. जर त्यांच्याकडून बोलावणे आले, तर प्रचारासाठी जाण्याचा विचार करू शकते, असे त्यांनी सूचित केले. त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंध आणि राजकारण यातील समतोल कसा साधला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रक्रियेची जबाबदारी अजित पवार गटाकडे होती, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली. याबाबतचे उत्तर त्यांनाच विचारावे, असे म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. तसेच निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते उत्साहाने निवडणूक लढवतात, त्यामुळे स्पर्धा होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सुप्रिया सुळे या पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कुटुंबाच्या ऐक्याचा उल्लेख करत, संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आहे, असे सांगितले. त्यामुळे पवार कुटुंबातील नातेसंबंध अजूनही मजबूत असल्याचा संदेश त्यांनी दिला. बारामती पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आधीच जाहीर झाला आहे. 30 मार्च 2026 रोजी अधिसूचना जारी झाली असून 6 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी झाली, तर 9 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. मतदान 23 एप्रिल रोजी होणार असून मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. 23 एप्रिलला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्याचेही दिसून आले. एकूण 53 उमेदवारांपैकी 30 जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनीही माघार घेतल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा यांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे आता बारामतीत एकूण 23 उमेदवार रिंगणात असून, 23 एप्रिलला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *