![]()
करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या गुन्ह्याची पाळेमुळे थेट कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी कोल्हापूरच्या अविनाश कोतोलीकर यास अटक केली असू
.
घोटी येथील फिर्यादी दिलीप राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोहर भोसले याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, मठात भेटण्यासाठी सुरुवातीला ११ हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर औषधाच्या नावाखाली आणखी ३० हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तुमचा मुतखड्याचा आजार पूर्ण बरा करतो, असे सांगून लाल रंगाची पावडर देऊन फसवणूक केल्याची त्यांची तक्रार आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी अविनाश कोतोलीकर याला करमाळा पोलिस ठाण्यात सलग तीन दिवस चौकशीसाठी बोलवून चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवार दि. २८ मे रोजी अटक केली. त्यानंतर त्याला शुक्रवार दि. २९ मे रोजी करमाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आता त्याला सोमवार दि. १ जून रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जादूटोणाविरोधी कायदा, आर्थिक फसवणूक व धमकावणे या प्रकरणी दि. ११ मे रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक झालेली आहे.
तीन दिवस संशयिताची पोलिसांनी केली चौकशी