Headlines

अधिक मासातील आध्यात्मिक ज्ञान प्रबोधनातून मानवाचा बौद्धिक विकास:ह.भ.प. ॲड.शेवाळे महाराजांच्या भागवत सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ‎



अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. दर ३ वर्षांतून एकदा येणारा हा शुभ महिना आहे, कारण अधिक महिना हा भक्ती, देवधर्म करणे, संत महात्म्यांचे कथा, भागवत ऐकणे यासाठी शुभ असतो; म्हणूनच या अधिक महिन्यात अनेक ठिक

.

अवंती नगर मधील गणेश विठ्ठल मंदिर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भागवत सप्ताहाचे शुभारंभ नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक महेश इंगळे यांचा भागवत साप्ताहिकाचे कथाकार ह.भ.प. ॲड. शेवाळे महाराज यांनी सत्कार करून आशीर्वाद दिले.

पुढे बोलताना नगरसेवक महेश इंगळे यांनी सांगितले की, गेल्या ३३ वर्षांपासून दर ३ वर्षांनी रमेश शिंदे, आपलं चंद्र वर्ष ३५४ दिवसांचं, पण सूर्य वर्ष ३६५ दिवसांचं असतं. हे ११ दिवसांचं अंतर भरून काढण्यासाठी दर ३२ महिन्यांनी एक महिना जास्त धरला जातो, तोच अधिक महिना असतो. या भागवत सप्ताह श्रवणाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते श्रीमद् भागवत ग्रंथाची व छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली. वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात येथील मराठा समाजाचे नेते तथा गणेश विठ्ठल मंदिर सांस्कृतिक मंडळाचे विश्वस्त समिती अध्यक्ष सुनील रसाळे यांनी अधिक महिन्यात भागवत सप्ताह आयोजित करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. आपल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातही या अधिक महिन्यात अनेक स्वामी भक्त स्वामींचे दर्शन घेऊन धन्य होतात. या धार्मिक सोहळ्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विश्वस्त मंडळ नंदकुमार चव्हाण, अण्णाराव पाटील, बंडू पवार, राजू जवंजाळ, महेश पवार, भाऊ धोत्रे, रमेश शिंदे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

अधिक महिन्याचे वैज्ञानिक अन् धार्मिक महत्त्व



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *