Headlines

संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट; नाशिक, जळगावसह अकोला जिल्ह्यात पाऊस:अवकाळीचा तडाखा; राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, 6 जूनपर्यंत इशारा




छत्रपती संभाजीनगरसह मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. संभाजीनगर जिल्ह्यासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वादळी पावसासह गारपीट झाली. अनेक ठिकाणी शेतीचे तसेच फळबागांचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर शहरात सायंकाळनंतर ढग दाटून आले. सोसाट्याचे वारे व धुळीमुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली. जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, फुलंब्री, कन्नड तालुक्यात परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह मान्सूनपू्र्व पावसाने ३० मिनिटे हजेरी लावली. पिशोरमध्ये जवळपास १५ मिनिटे गारपीट झाली. शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नको : मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्री कार्यालयाने सूचना जारी केली आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यात १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. विजांच्या कडकडाटावेळी खबरदारी घ्यावी. ६ जूनपर्यंत पाऊस, गारपीटही शक्य १ जून: मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस शक्य. विदर्भ, कोकण व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा. २ व ३ जून: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा शक्य. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पाऊस. ४ ते ६ जून: कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे., तर विदर्भात काही ठिकाणी हवामान कोरडे राहील. दिव्य मराठी एक्स्पर्ट- मान्सूनचे आगमन लांबू शकते पूर्व मोसमी पावसाची सुरुवात झाली असली तरी सर्वदूर झालेली नाही. केरळात ३ ते ४ जूनच्या आसपास पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे, त्यानंतर तळकोकणात ७ जूनपर्यंत पोहचू शकतो. जर रेंगाळला व काही घटक बदल झाले तर तो १० जूनपर्यंत लांबणीवर जाऊ शकतो. मराठवाडा विदर्भात मान्सून १५ जूननंतर दाखल होण्याची शक्यता आहे. – अभिजित मोडक, हवामान अभ्यासक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *