![]()
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या ट्रस्टचा कारभार पाहण्यासाठी राज्यपालांच्या आदेशानुसार शासनाचे उपविधी सल्लागार आणि उपसचिव, डॉ. कुंवरसिंह रा. सिंघेल यांनी नाशिकच्या वरिष्ठ धर्मादाय सहआयुक्तांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सप्तशृंगी गड ट्रस्टच्या नियमित कामकाजाची सर्व जबाबदारी त्यांच्याकडे साेपविण्यात आली असून जिल्हा सत्र न्यायाधीश आणि तहसीलदारांचे त्यावरील नियंत्रण संपुष्टात आले आहे. सप्तशृंगी गडावरील ट्रस्टचा संपूर्ण कारभार पाहण्याची जबाबदारी ही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याद्वारे ५ विश्वस्त नेमून, त्यासोबत कायमस्वरूपी विश्वस्त तहसीलदार यांच्यामार्फत पाहण्यात येत होती. त्यानुषंगाने पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा त्या जागी नवीन विश्वस्त नियुक्त करून कारभार करण्याची परंपरा होती. दरम्यान, या निर्णयामुळे दर्शन रांगांचे नियाेजन, नियमीत पूजाविधी यावर या निर्णयाने काहीही परिणाम हाेणार नाही. पूर्ववत वेळेनुसार दर्शन, आरती आणि पूजाविधी सुरू राहतील. सर्व नियंत्रण सह-धर्मादाय आयुक्तांकडे असेल. त्यांच्या निर्देशांनुसार विश्वस्त कशी व काेणत्या पद्धतीने हाेणार, हे निश्चित हाेईल.
Source link
सप्तशृंगी गडाचा कारभार नाशिक धर्मादाय सहआयुक्तांकडे असणार:सत्र न्यायाधीश व तहसीलदारांचे नियंत्रण आता संपुष्टात