Headlines

Navnath Ban Attacks Ravindra Dhangekar Over Pune Graduate Seat Loss


मित्रपक्षाच्या एका जागेच्या हव्यासापोटी आमचा उमेदवार पुणे पदवीधर मतदारसंघात पराभूत झाला. तर छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चव्हाण यांना शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी विरोध करत त्यांच्या विरोधात काम केले. पुण्यात तर रवींद्

.

नवनाथ बन म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना माझा प्रश्न आहे की रवींद्र धंगेकर हे शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत, ते जर पदवीधरांना आवाहन करत असतील की भाजपला मतदान करू नका तर हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर एकनाथ शिंदे कारवाई करणार का? अमरावतीमध्ये महायुतीम्हणून आम्ही शिवसेनेला संपूर्ण मदत केली. काही लोकांनी बंडखोरी केली त्यांना 6 वर्षांसाठी रवींद्र चव्हाणांनी पक्षातून निलंबित केले. एकनाथ शिंदे हिंदुत्वासाठी भाजपसोबत आले आहेत ते धंगेकरांवर कारवाई करतील अशी आम्हाला खात्री आहे.

शिवसेनेच्या नेत्यांवर टीका

नवनाथ बन म्हणाले की, पुण्यामध्ये धंगेकरांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांनी विरोधात भूमिका घेतली. संजय शिरसाट यांनीही असेच काही विधान केले होते. विजयासाठी आपल्या मित्रपक्षांना सहकार्य करायचे की दोघांचे भांडण करत तिसऱ्याचा लाभ होऊ द्यायचा याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण 5 जागा महायुती जिंकू शकत होती. महायुती म्हणून आत्मपरीक्षण करण्याची सर्वांना गरज आहे.

धंगेकरांनी सांगून मुख्यमंत्रीपद बदलत नाही

नवनाथ बन म्हणाले की, रवींद्र धंगेकरांसारख्या लोकांमुळे महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकले नाही. मुख्यमंत्री कोण व्हावा हे जनतेने ठरवले आहे. धंगेकरांनी सांगून मुख्यमंत्रीपद बदलत नाही, महाराष्ट्रातील जनतेने देवाभाऊंना आशीर्वाद दिले आहेत. धंगेकर काँग्रेसमध्ये आहेत असे त्यांना वाटते का? त्यांनी 12 पक्ष बदलले आहे. त्यांनी देवाभाऊंवर काही बोलू नये. पदवीधर मतदारसंघात त्यांनी भाजपला मतदान करू नका असे आवाहन कोणाच्या सांगण्यावर केले? एकनाथ शिंदे त्यांच्यावर काय कारवाई करणार? शिवसेनेकडून योग्य ती कारवाई झाली पाहिजे. धंगेकर आमच्याविरोधात प्रचार करत होते याचा आमच्याकडे पुरावा आहे. आम्ही अमरावतीमध्ये तसे काही केले नाही.

बॅलेट पेपरवर काँग्रेसचा दारुण पराभव

नवनाथ बन म्हणाले की, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे काल निकाल लागले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये दोन जागांवर महायुतीचा विजय झाला तर मविआ 3 जागांवर जिंकली. देशभरात बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. देशभरातील 28 जागांपैकी 1 जागेवर काँग्रेसला यश मिळाले. कालपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशा पद्धतीची गर्जना राहुल गांधी, खरगेयांच्यापासून संजय राऊतांपर्यंत सर्व जण करत होते. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली काय आणि EVM वर निवडणूक झाली तरी जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो तो काँग्रेसवर नाही. महाराष्ट्रातील जी जागा निवडून आली ती दुसऱ्या पसंतीच्या मतावर आली आहे.

ऐनवेळी शिवसेनेने सानपांना पाठिंबा दिला

नवनाथ बन म्हणाले की, राहुल गांधी यांनी आता तरी बॅलेट पेपर अशी बोंब न मारता जनतेमध्ये जात जनतेचा कौल स्वीकारला पाहिजे. बॅलेट आणि EVM दोन्ही ठिकाणी इंडिया आघाडीचे बारा वाजले आहेत. तर एनडीए पुन्हा एकदा सक्षम असल्याचे दिसून येते. महायुतीमध्ये पुण्याच्या जागेसाठी थोडासा समन्वय असता तर ती जागा भाजपने जिंकली असती तर छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असता. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ऐनवेळी शिवसेनेने सचिन सानप यांना पाठिंबा दिला. खरतर या मतदारसंघासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे होते. त्यांचा अर्ज मागे घेतला पण ऐनवेळी शिवसेनेने सानप यांना पाठिंबा दिला. याचा परिणाम झाला की त्यांना 16 हजारांहून अधिक मते मिळाली. तर पदवीधर मतदारसंघात स्मिता जाधव 11 ते 12 हजार पराभूत झाल्या. जे शिक्षक मतदारसंघात मतदार असतात तेच पदवीधर म्हणून सुद्धा मतदान करत असतात. ते मते जर भाजपला पडली असती तर स्मिता जाधव विजयी झाल्या असत्या.

हे ही वृत्त वाचा

हा सरकारचा पराभव, आता राज्याचे नेतृत्व पुन्हा एकनाथ शिंदेंकडे द्या:विधान परिषद निकालानंतर रवींद्र धंगेकरांची मोठी मागणी

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला बसलेल्या मोठ्या धक्क्यानंतर आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपने “शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही, अन्यथा पाचही जागा जिंकलो असतो” असा आरोप केल्यानंतर, आता शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पलटवार केला आहे. तसेच, या निकालानंतर समन्वय साधण्यासाठी राज्याचे नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.