Headlines

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी दोन दिवस शिल्लक:3 जून ही प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत, अमरावतीत एकूण 43 हजार 110 जागा उपलब्ध




केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या सर्वसाधारण यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चितीसाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. ही यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती, ज्यात विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयांचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी ४३ हजार ११० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८ हजार ५७० जागा, कला शाखेच्या १८ हजार ३०० जागा आणि वाणिज्य शाखेच्या ६ हजार २४० जागांचा समावेश आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल करताना भाग दोनमध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवला होता, त्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार मिळालेल्या महाविद्यालयांची यादी २९ मे रोजी जाहीर करण्यात आली. या विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे. सूत्रांनुसार, जिल्ह्यातील एकूण जागांमध्ये अल्पसंख्याक कोट्यासाठी ५ हजार ८०० जागा, इन-हाऊस कोट्यासाठी ३ हजार ७८९ जागा आणि व्यवस्थापन कोट्यासाठी २ हजार ५४ जागा राखीव होत्या. यापैकी बहुतांश जागांचे प्रवेश शून्य फेरीदरम्यान पूर्ण झाले आहेत. शून्य फेरीमध्ये इन-हाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यांतर्गत प्रवेशाची संधी देण्यात आली होती, त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. दरम्यान, दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गुणपत्रिका मंगळवार, २ जूनपासून वितरित केल्या जाणार आहेत. दहावीचा निकाल गेल्या महिन्यात ऑनलाईन घोषित झाल्यानंतर, विद्यार्थी मूळ गुणपत्रिकेची वाट पाहत होते. या काळात त्यांनी प्रिंटआउट काढून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *