Headlines

कोट्यवधींचा चुराडा:पैठण तालुक्यात घरकुलाचे काम नाही तरी 1 हजार लाभार्थींनी उचलले अनुदानाचे पैसे, 28,261 घरकुलांना मंजुरी, प्रत्यक्षात 9 हजार 143 घरकुलांची कामे पूर्णची नोंद‎



तालुक्यात घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता झाली असून, कामाची प्रत्यक्ष प्रगती न होता एक हजाराहून अधिक लाभार्थ्यांना घर न बांधताच खात्यात हप्ते जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

.

तालुक्यात विविध योजनांतर्गत २८ हजार २६१ घरकुलांना मंजुरी आहे . त्यापैकी २१ हजार ८९५ लाभार्थ्यांना पहिला, १३ हजार ८७८ जणांना दुसरा, ११ हजार १७३ जणांना तिसरा आणि ६७६३ जणांना चौथा हप्ता वितरित केला आहे. याच कालावधीत प्रत्यक्षात ९ हजार १४३ घरकुले पूर्ण झाल्याची नोंद आहे. हप्ते वितरण आणि पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या यामध्ये तफावत असून पाचशेहुन अधिक लाभार्थ्यांना एकही विट न रचता संपूर्ण हप्ते देण्यात आले आहेत. पाचशेहून अधिक घरकुलांच्या प्रकरणांत बांधकामाची अपेक्षित प्रगती नसतानाही निधी वितरित आहे. काही ठिकाणी पायाभरणीही पूर्ण नसताना पुढील हप्ते देण्यात आले असल्याचे समोर आले आहे. एकूण मंजूर घरकुले २८,२६१ पहिला हप्ता वितरित २१,८९५ दुसरा हप्ता वितरित १३,८७८ तिसरा हप्ता वितरित ११,१७३ चौथा हप्ता वितरित ६,७६३ पूर्ण झालेली घरकुले ९,१४३ अनियमित घरकुले १ हजार रमाई आवास योजनेअंतर्गत ४ हजार ६८१ घरकुलांना मंजुरी आली. त्यापैकी ४ हजार २६७ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला तरी पूर्ण झालेली घरे ३ हजार ३६२ आहेत. तर रमाई, शबरी व प्रधानमंत्री आवास योजना फेज-१ अंतर्गत मंजूर ४६६ घरकुलांपैकी केवळ २९४ घरे पूर्ण झाल्याची नोंद आहे. राजेश कांबळे, घरकुल योजना प्रमुख, पंचायत समिती, पैठण. Q. अनेक लाभार्थींनी घर न बांधताच पैसै उचचले? A. गावनिहाय चौकशी करुन त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येतील. Q. निधी खात्यावर वर्ग करणाऱ्यांवर कारवाईचे काय? A. घर न बांधता खात्यावर पैसे टाकणाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. Q. लाभार्थींकडून हप्त्यांसाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे? A. घरकुलासाठी पैसै घेतले असतील तर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येईल. Q. तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत नाही? A. संबधितांना तशा सुचना आहे. पाहणी करणे गरजेचे आहे. घरकुल योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक टप्प्यावर बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करूनच पुढील हप्ता वितरित करणे बंधनकारक आहे. ग्रामसेवक, तांत्रिक सहाय्यक, गटविकास कार्यालय आणि संबंधित यंत्रणेकडून प्रगती अहवालाच्या आधारे निधी मंजूर केला जातो. मात्र, प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यांना अपेक्षित काम न करताच पुढील हप्ते कंत्राटी अभियंता यांनी टाकले आहेत. अनेक गावांमध्ये तर घरकुलाचे काम सुरू नसतानाही लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

प्रधानमंत्री आवास योजनेतच मोठी तफावत २०१६-१७ ते २०२५-२६ कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत २० हजार ३२६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १५ हजार ३६८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला; मात्र पूर्ण झालेली घरे केवळ ४ हजार ६६७ आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *