Headlines

प्री-सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत कोपरगावचे खेळाडू चमकले:संजीवनी अकॅडमीची क्रीडा क्षेत्रातही आघाडी कायम, स्पर्धेत उपविजेतेपदावर मारली बाजी‎



कोपरगाव संजीवनी अकॅडमीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने “साऊथ झोन (सेकंड) सीबीएसई प्री-सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा २०२६’ मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. दक्षिण विभागातील केरळ, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या चा

.

साखळी फेरीत संजीवनी संघाने सेंट्रल रेल्वे स्कूल, कल्याणचा २-० असा पराभव करून विजयी सुरुवात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत समता इंटरनॅशनल स्कूलचा ३-० असा दणदणीत पराभव करत संजीवनीने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात केरळच्या डॉन बॉस्को स्कूलविरुद्ध अत्यंत चुरशीची लढत झाली. नियोजित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर, पेनल्टी शूटआऊटमध्ये संजीवनी अकॅडमीने ४-३ असा थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात पुण्याच्या आर्मी पब्लिक स्कूलविरुद्ध संजीवनीच्या खेळाडूंनी जिद्दीने संघर्ष केला आणि उपविजेतेपद मिळवले. या संघात कर्णधार विहान वाघ, गोलरक्षक ईशान सय्यद, आर्यन सोनवणे, सात्विक औताडे, नैतिक सरोज, गगनराजे जाधव, निर्भय पारख, आरुष शिंदे, प्रत्यूष जाधव, विश्वजित मांजरे, श्रेयस भड आणि शौर्य वैभव घुले या संजीवनीच्या खेळाडूंनी शानदार खेळ केला.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मनाली कोल्हे, डिरेक्टर ऑफ ऑडिट सुंदरी सुब्रमण्यम आणि प्राचार्या अनुश्रीता सिंह यांनी खेळाडूंसह क्रीडा विभाग प्रमुख विरुपक्ष रेड्डी व फुटबॉल प्रशिक्षक मोती कुमार यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

स्पर्धेतील थरारक प्रवास असा

संजीवनी अकॅडमीच्या खेळाडूंनी साखळी फेरीत कल्याणच्या सेंट्रल रेल्वे स्कूलवर २-० ने मात करून संजीवनीची विजयी सुरुवात केली. उपांत्यपूर्व फेरीत समता इंटरनॅशनल स्कूलचा ३-० ने दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत केरळच्या डॉन बॉस्को स्कूलविरुद्ध १-१ च्या बरोबरीनंतर, पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा संजीवनीचा थरारक विजय मिळवला तर अंतिम फेरीत पुण्याच्या आर्मी पब्लिक स्कूलविरुद्ध जोरदार संघर्ष करत संजीवनी अकॅडमीची रौप्य पदकाची कमाई.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *