Headlines

येरमाळ्यात पार्किंग वादातून आष्टीच्या महाराजांसह कुटुंबीयांना बेदम मारहाण:चार तास थांबूनही घेतली नाही फिर्याद, चार-पाच जणांकडून मारहाण‎


.

येडेश्वरी मंदिर परिसरात पाच ते दहा जणांकडून नियमबाह्य पार्किंगचे पैसे घेण्यासाठी चार ते पाच जणांनी दमदाटी केली. त्यावेळी पैसे देऊनही पार्किंगच्या कारणावरून कीर्तनकाराला व कुटुंबीयांना मंगळवारी दगड, बेल्ट, रॉडने बेदम मारहाण केली. दोघेही रक्तबंबाळ झाले होते. तशाच अवस्थेत येरमाळा पोलिस ठाण्यात गेले. पाच तास थांबूनही पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली नाही. उलट मारहाण करणारे चार-पाच जण तेथे येऊनही दमदाटी करू लागले. त्यामुळे नाइलाजाने आष्टी येथे आपल्या गावी आष्टी येथे जाऊन बुधवारी तक्रार नोंदवावी लागली. येरमाळा पोलिसांनी फिर्याद दाखल करून का घेतली नाही, कोणाच्या दबावाखाली पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मंगळवारी (दि. २) बीड जिल्ह्यातील कडा (ता. आष्टी) येथील कीर्तनकार परमेश्वर केरूळकर हे कुटुंबीयासह देवदर्शनासाठी श्री येडेश्वरी देवीला आले असता नियमबाह्य पार्किंग गोळा करणाऱ्या चार ते पाच जणांनी यांच्याकडून जबरदस्तीने १०० रुपये पार्किंग घेतली. या वेळी गर्दी असल्याने गाडी लावण्यास उशीर का करतोस, असे म्हणत यांच्यासह पाच ते दहा जणांनी शिवीगाळ करत दगड, बेल्ट, रॉडने मला, पत्नी रूपाली व गाडीतील अमर रेड्डी व महिलांना, मुलांना बेदम मारहाण केली. त्याच बरोबर या मारहाणीत आमच्या व महिलांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने, पैसे ओरबाडून नेले.

भाविकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहू ^श्री येडेश्वरी देवी मंदिर परिसरामध्ये नियमबाह्य पार्किंगप्रकरणी भाविकांना मारहाण करण्यात आली आहे. येरमाळा पोलिस ठाण्यात वरीलप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, येणाऱ्या काळात भाविकांच्या संरक्षणासाठी येरमाळा पोलिस कटिबद्ध राहील. -यशवंत घोडके, सहायक पोलिस निरीक्षक, येरमाळा समिती पार्किंगचे पैसे घेत नाही ^श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत चालली असून, इथे येणाऱ्या भाविकांना नियमबाह्य पार्किंग, जुगार, किरकोळ चोरी, अवैध प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. श्री येडेश्र्वरी देवस्थान समिती कसलेही पार्किंग पावती कर घेत नाही. भाविकांना मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. -समाधान बेदरे, सदस्य, श्री येडेश्वरी देवस्थान समिती

घोडकेंना ‘यश’ मिळणार का? येरमाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक तात्याराव भालेराव यांच्या पुढे परिसरातील श्री येडेश्वरी देवी मंदिरावरील पहाटेपासूनच सुरू टेबल, गावठी दारू, देशी, विदेशी बनावट दारू अड्डे, अवैध धंदे यासह राष्ट्रीय महामार्गवरील वाटमारी, अशी मुख्य आव्हाने होते. ते दोन हात करायचा प्रयत्न करत होते. परंतु अपयशी ठरले. आता नव्याने रुजू झालेले यशवंत घोडके आव्हान स्वीकारणार का?

पोलिस ठाण्याच्या परिसरातही दमदाटी, तरी येरमाळा पोलिसांचे डोळे होते बंद आम्ही घाबरून येरमाळा येथील पोलिस ठाण्यात आलो. उपचारासाठी येथील रुग्णालयात उपचार करून तक्रार देण्यासाठी सायंकाळी चार वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात होतो. परंतु तक्रार घेतली नाही. काही वेळाने येथेही ते मारहाण आणि पार्किंग गोळा करणारे पाच ते दहा जणांनी परत दमदाटी करू लागले. भीतीपोटी आम्ही गावी परतलो. तेथे पोलिसांनी दखल घेतली नाही. बुधवारी आष्टी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेवेळी मारहाणीचे प्रकार येरमाळा हे गाव राज्यातील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवस्थानमुळे प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून देवी मंदिर परिसरातच अवैध धंदे व चोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. भाविकांना अडवून मारहाण करून पैसे घेतले जातात. दर मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला असे प्रकार घडतात. काही वेळा दाखल होण्यापूर्वीच मिटवले जातात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *