Headlines

मोहोळ तालुक्यात डिझेल- पेट्रोलचा तुटवडा:वाहनधारकांचे हाल; अमेरिका इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम‎




अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींचे पडसाद ग्रामीण भागातही उमटले असून, मोहोळ शहरासह तालुक्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्याने शेतकरी, व्यापारी आणि वाहनधारकांना इंधनासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर गेल्या काही दिवसांपासून डिझेल-पेट्रोल उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. दि. ३१ मे रोजीही अनेक वाहनधारकांना पंपावरून इंधन न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले. चारचाकी, दुचाकी तसेच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या चालकांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा कालावधी सुरू ^डिझेल-पेट्रोल कमतरतेचा परिणाम शेती मेहनतीसह व्यवसायावरदेखील होत आहे. देशासह जिल्ह्या बरोबरच तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात स्वदेशी तेल कंपन्यासह कारखानदारांनी देशातील विविध उत्पादनातून डिझेल, पेट्रोल सारख्या तेलाची निर्मिती केल्यास पेट्रोल,डिझेल कमतरता रोखण्यास मदत होईल. – बाळासाहेब पवार, वाहनधारक पूर्वतयारीचा कालावधी सुरू असून, शेतीकामांसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज असते. मात्र इंधनाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. व्यापारी वर्गालाही मालवाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी मोहोळ तालुक्यात डिझेल-पेट्रोलचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गातून होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इंधनटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. व्यवसायावर परिणाम



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *