![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय युवा महोत्सवात हर्सूल-सावंगी येथील कला वरिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. या महोत्सवातील लघुपट स्पर्धेत महाविद्यालयाची बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी हर्षदा सुभाष राबडे हिने तयार केलेल्या ‘गुरु दक्षिणा’ या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण यंदाच्या केंद्रीय युवा महोत्सवात कला वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला होता. महाविद्यालयाने एकूण ८ विविध स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यात ‘गुरु दक्षिणा’ या लघुपटाने परीक्षकांची मने जिंकत पहिला क्रमांक मिळवला. या दैदिप्यमान यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉ. विशाला शर्मा यांच्या हस्ते विजेत्या हर्षदा राबडे हिचा गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक विभागाचे मोलाचे योगदान विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या मोठ्या यशामागे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे आणि प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. विनोद बैरागी, सहयोगी प्रा. डॉ. अरुण कोळी, डॉ. जीजा राऊत, डॉ. युवराज आंधळे, प्रा. डॉ. हिरण्यकुमार, डॉ. शारदा ठोके आणि डॉ. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. केंद्रीय महोत्सवातील या सुवर्णवेधामुळे संपूर्ण परिसरात महाविद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे कौतुक होत आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या डॉ. विशाला शर्मा, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या हर्षदा राबडेसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. हेही वाचा.. दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर: बारावीची परीक्षा 8 फेब्रुवारीपासून, तर दहावीची 15 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीला आता अधिक वेग येणार आहे. बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 16 मार्चपर्यंत चालेल. त्यानंतर दहावीच्या लेखी परीक्षेला 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल आणि 11 मार्चला परीक्षा संपणार आहे. सविस्तर वाचा
Source link
युवा महोत्सवात हर्सूल-सावंगीच्या कला वरिष्ठ महाविद्यालयाचा डंका:हर्षदा राबडेच्या 'गुरु दक्षिणा' लघुपटाने पटकावला प्रथम क्रमांक