Headlines

निदा खानविरोधात आरोपपत्र दाखल:पीडितेचे 'ब्रेनवॉश' करण्यासाठी थेट झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवल्याचे तपासात उघड




नाशिकमधील बहुचर्चित TCS महिला कर्मचारी शोषण आणि धर्मांतर प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. 2022 ते 2026 या चार वर्षांच्या कालावधीत पीडित तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि मानसिक छळाचा संपूर्ण घटनाक्रम यात मांडण्यात आला आहे. पीडितेचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने तिला मोबाईलमध्ये ‘इस्लाम ॲप’ डाऊनलोड करायला भाग पाडण्यात आले, तसेच ऑफिसच्या पँट्रीमध्ये तिच्यासोबत अश्लील गैरवर्तन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही या आरोपपत्रातून उघडकीस आला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या अधिकृत दोषारोपपत्रातून आणखी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, त्यात थेट कट्टरतावादी झाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले आहे की, पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने आरोपींकडून तिला सोशल मीडियावरील झाकीर नाईकचे व्हिडिओ सातत्याने दाखवले जात होते. याच व्हिडिओंचा आधार घेऊन तरुणीचे पद्धतशीरपणे ‘ब्रेनवॉश’ करण्याचा आणि तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा अत्यंत गंभीर प्रकार आरोपींकडून केला जात असल्याचे यातून उघड झाले आहे. एमआयएमच्या मतीन पटेलवर गंभीर ठपका पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रानुसार, दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खान या तिघांनी संगनमत करून पीडितेच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिचे मोठ्या प्रमाणावर शोषण आणि छळ केला. या प्रकरणात एमआयएमचा मतीन पटेल या आणखी एका आरोपीवरही पोलिसांनी गंभीर ठपका ठेवला असून, मुख्य आरोपी निदा खान हिला पोलिसांच्या अटकेपासून वाचवण्यासाठी त्याने आश्रय दिल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. मानसिक-शारीरिक छळ आणि लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध 2022 मध्ये आरोपींनी पीडित तरुणीला टीसीएस (TCS) कंपनीत नोकरी मिळवून दिली आणि त्यानंतर तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी हिंदू देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने करून तिच्या धार्मिक भावना सातत्याने दुखावल्या. याच काळात आरोपी दानिश शेख याने पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याशिवाय, तिच्या जातीवरून अपमानास्पद शब्दांचा वापर करून तिला अत्यंत हीन वागणूक देण्यात आली. बुरखा व हिजाब घालण्याची सक्ती शारीरिक आणि मानसिक शोषणाव्यतिरिक्त, पीडितेचे सक्तीने धर्मांतर करण्यासाठी आरोपींनी पद्धतशीर प्रयत्न केले. तिच्या मोबाईलमध्ये जबरदस्तीने इस्लाम धर्माचे ॲप डाऊनलोड करून तिला त्यासंबंधीचे व्हिडीओ आणि रील्स पाठवले जात होते, तसेच धर्माची पुस्तके वाचण्याची सक्तीही करण्यात आली. आरोपींनी पीडित हिंदू तरुणीचे नाव बदलून ‘हनिया’ असे ठेवले आणि तिच्या इच्छेविरोधात तिला बुरखा व हिजाब घालण्यास, तसेच रोजा ठेवण्यास भाग पाडले. तिने नमाजपठण न केल्यास तिचे कुटुंबीय नरकात जातील, अशी सतत भीती दाखवून तिचे प्रचंड मानसिक खच्चीकरण करण्यात आले. ऑफिसच्या पँट्रीमध्ये पीडितेशी अश्लील गैरवर्तन मुख्य आरोपी दानिशने पीडितेचे केवळ शारीरिक शोषणच केले नाही, तर तिच्याकडून मौल्यवान वस्तू आणि मोठी रोख रक्कमही उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय, तौफिक अत्तार या दुसऱ्या आरोपीने चक्क ऑफिसच्या पँट्रीमध्ये पीडितेशी अश्लील गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकारही उघडकीस आला आहे. आरोपींना कठोर शिक्षेची मागणी या संपूर्ण प्रकरणाचा नाशिक पोलिसांनी अत्यंत सखोल तपास केला असून, त्या आधारे न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले आहेत. या अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकारामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. आता पीडित तरुणीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि या कृत्यातील सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून जोर धरू लागली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *