Headlines

"सचिन उर्फ येडा''ची टीप दिल्याचा‎ संशय; मित्रांकडूनच तेजसचा खून:यवतमाळ‎ जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ; पाच महिन्यांत 30 खून अन् 47 खुनाचे प्रयत्न‎




शहरातील जामनकर नगर परिसरात ‎‎गुरुवारी दुपारी घडलेल्या तेजस ‎‎गायकवाड या तरुणाच्या ‎हत्याकांडाचा थरारक खुलासा ‎‎पोलिसांनी केला आहे. केवळ ‎‎संशयावरून मित्रांनीच मित्राचा ‎घरात घुसून निर्घृण खून केल्याची ‎‎धक्कादायक माहिती समोर आली ‎‎आहे. “सचिन उर्फ येडा” राठोड‎ याची टीप मारेकऱ्याला दिल्याचा‎ संशय आरोपींना होता. याच रागातून‎ हा थरकाप उडवणारा “गेम”‎ झाल्याचे उघड झाले आहे. या ‎घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात‎ खळबळ उडाली आहे. रोहन इंगळे ‎‎(वय 28, रा. संकट मोचनरोड),‎ हर्षल उर्फ टोबू मसराम (वय 20,‎रा. शिंदेनगर) आणि प्रणय गुंजाळ ‎(वय 22, रा. शिंदेनगर) अशी‎ ताब्यात घेण्यात आलेल्या ‎मारेकऱ्यांची नावे आहे.‎ या प्रकरणी मिळालेल्या ‎‎माहितीनुसार, मृत तेजस गायकवाड ‎‎आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र‎ होते. मात्र, सचिन उर्फ येडा ‎याच्याशी संबंधित गोपनीय माहिती‎ (टीप) तेजसनेच लीक केल्याचा ‎संशय आरोपींच्या मनात बळावला‎ होता. गुरुवार, दि. 4 जून रोजी दुपारी 1‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वाजेच्या सुमारास, याचा वचपा‎ काढण्यासाठी आरोपींनी थेट‎ तेजसच्या घरात प्रवेश केला. काही‎ समजण्याच्या आतच धारदार‎ शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार‎करून त्याची हत्या करण्यात आली.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎या घटनेनंतर अवधूतवाडी पोलिस,‎ स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय ‎पोलिस अधिकारी दिनेश बैसाने,‎अतिरिक्त पोलिस अधीक्षक‎ अशोक थोरात यांनी तातडीने ‎घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎वेगाने चक्रे फिरवत तीन संशयित ‎आरोपींना सायंकाळीच नेर येथून‎ ताब्यात घेतले. मृताच्या आईने‎ दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी‎ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे.‎ जिल्ह्यात गुन्हेगारी,‎नशेखोराची संख्येत वाढ‎ जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठी वाढ‎ झाली आहे. यामागे “नशा” हे‎ सर्वात मोठे कारण समोर येत ‎आहे. शहरासह ग्रामीण भागात‎ एमडी ड्रग्स, गांजा, अवैध दारू‎ आणि इतर अमली पदार्थांचा‎ मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.‎ या जीवघेण्या नशेच्या आहारी‎ जाऊन तरुण पिढी रसातळाला ‎चालली आहे. नशेतून विवेक ‎हरपल्यामुळे क्षुल्लक वादाचे‎ रूपांतर थेट खुनासारख्या गंभीर ‎गुन्ह्यांमध्ये होत आहे. मागील पाच‎ महिन्यांची धक्कादायक‎ आकडेवारीमुळे जिल्ह्यातील‎ कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः‎धिंडवडे काढले आहेत.‎ भरदिवसा होणारे खून, टोळीयुद्ध‎,घरगुती वाद वाढले आहेत.‎ तीनही आरोपींना पाच‎दिवस पोलिस कोठडी‎ नेर येथून ताब्यात घेण्यात‎ आलेल्या तीनही संशयित‎ आरोपींना अवधूतवाडी ‎पोलिसांनी शुक्रवारी ‎न्यायालयात हजर केले. ‎पोलिसांनी न्यायालयासमोर या‎ गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार कोण,‎ हत्येसाठी वापरलेली धारदार‎शस्त्रे कोठून आणली आणि‎ यामागे आणखी कोणाचा हात‎ आहे का, याचा सखोल तपास‎ करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी‎ केली. न्यायालयाने दोन्ही ‎बाजूंचा युक्तिवाद ऐकून सर्व‎ आरोपींना पाच दिवसांची ‎पोलिस कोठडी सुनावण्यात‎ आली आहे.‎ वाढदिवसाची “ती” स्टोरी‎ठरली मृत्यूचे कारण -‎ पोलिस तपासात समोर आलेल्या‎ माहितीनुसार, तेजसच्या हत्येच्या‎ अवघ्या एक ते दोन दिवसांपूर्वी ‎”सचिन उर्फ येडा” याचा वाढदिवस‎ होता. या वाढदिवसाचे औचित्य‎साधून मुख्य मारेकरी रोहन इंगळे‎ याने सोशल मीडियावर एक स्टोरी ‎ठेवली होती. यामध्ये त्याने “सचिन,‎तुला वाढदिवसाचे गिफ्ट लवकरच‎ पाठवतो” असा थेट आणि‎ संशयास्पद उल्लेख केला होता.‎ रोहनने दिलेल्या या “गिफ्ट”च्या‎ धमकीचा रोष तेजस गायकवाड ‎याच्या गेम प्लॅनिंगकडेच होता, हे‎ आता स्पष्ट झाले असून ही सोशल ‎मीडिया स्टोरी तेजससाठी मृत्यूचे‎ कारण ठरली.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *