![]()
महाराष्ट्राला देशाचे आर्थिक इंजिन बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि अत्याधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दोन सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून तब्बल ४,०८० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, ४,७५० तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. राज्य सरकारला केवळ प्रशासन न मानता विकासातील भागीदार समजावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजकांना केले. या नव्या गुंतवणुकीमुळे राज्यातील औद्योगिक परिसंस्था अधिक भक्कम होईल आणि उच्च कौशल्यांवर आधारित रोजगाराला गती मिळेल. याप्रसंगी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह तसेच संबंधित कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. २ प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची निर्यात क्षमता वाढणार पुण्यात ५-जी उपकरणांची निर्मिती १,५०० कोटींची गुंतवणूक करून ‘जबिल’ कंपनी पुण्यात ५-जी उपकरणे व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित नेटवर्किंग स्विचगिअर्स बनवणार आहे. यातून ४ हजार रोजगार निर्माण होतील. हा प्रकल्प १७ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. रायगडमध्ये अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क उरण येथील जेएनपीए परिसरात २५ हेक्टर जागेवर ‘आरएसए ग्लोबल’ कंपनीकडून हे पार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी २,५८० कोटींची गुंतवणूक होईल व ७५० रोजगार मिळतील. येथे कंटेनर स्टॅकिंग, स्वच्छता आणि दुरुस्तीच्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील.
Source link
राज्यात एआय, 5-जीमध्ये 4,080 कोटींची गुंतवणूक:पुणे, रायगडमध्ये प्रकल्प, 4750 रोजगार मिळणार