![]()
प्रतिनिधी | अमरावती दिवसेंदिवस वाढणारे शहरीकरण, काँक्रिटचे जंगल आणि विकासकामांची घोडदौड सुरू असतानाच, महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे शहराने पर्यावरण संवर्धनात राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५’ मध्ये अमरावती शहराने देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावून मानाचा तुरा खोवला आहे. यापूर्वी २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये शहराने अनुक्रमे तृतीय, प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला होता. याशिवाय राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान (२.० ते ५.०)’ अंतर्गत शहराला सलग विभाग स्तरीय प्रथम पारितोषिक पटकावले आहे. गेल्या काही वर्षांत मनपाने व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवली आहे. २०२३-२४ मध्ये ७२,००० पैकी ४७,००० आणि २०२४-२५ मध्ये ६५,००० पैकी ४१,००० वृक्ष यशस्वीरीत्या जगवून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.
शहराचे एकूण क्षेत्रफळ १२१.६५ चौ. कि.मी. असून, लोकसंख्या सुमारे ८ लाख आहे. विकासकामांची धूळ, वाहनांचा धूर यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मनपाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ॲम्बिअंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग ‘२०२६ च्या अहवालानुसार, अमरावतीमधील रहिवासी, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रातील हवेचे प्रदूषण ६९.६८ ग्रॅम पर क्युबिक मीटर आहे. हे हे निश्चित केलेल्या १०० या धोक्याच्या पातळीपेक्षा सुमारे ३०.३२ ग्रॅम पर क्युबिक मीटरने कमी आढळले आहे. शहराची सरासरी हवेची गुणवत्ता समाधानकारक नोंदवली गेली असून, अमरावतीचा समावेश ‘समाधानकारक’ वर्गवारीत कायम आहे. शहराला भविष्यातही पर्यावरण क्षेत्रात अव्वल स्थानी ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ काढून सहकार्य करणे गरजेचे आहे. सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवून आणि दैनंदिन सवयी बदलून लोकसहभागाच्या जोरावर आपण आपले शहर अधिक सुंदर आणि प्रदूषणावर मात करणारे बनवू या. एप्रिल २०२६ पर्यंत तब्बल ४९.५० लाखांचा दंड वसूल केला असून, गेल्या वर्षात ३६ हजार किलोपेक्षा जास्त प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले . शहरात वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शैक्षणिक संस्था, रुग्णालये, न्यायालयांच्या सभोवताली १०० मीटरचा परिसर ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे. शहरात एकूण ५८१ शांतता क्षेत्रे घोषित केली. मनपाने सुकळी कंपोस्ट डेपो आणि आकोली बायपास येथे मिळून तब्बल ३०० टीडीपी क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत. यामुळे भविष्यातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आजच पूर्ण झाले आहे. सुकळी कंपोस्ट डेपो येथील जुन्या कचऱ्याचे (लिगसी वेस्ट) बायोमायनिंग करून त्यातून निघालेले २१,५०० मेट्रिक टन आर.डी.एफ. सिमेंट प्रकल्पांना इंधन म्हणून पुरवण्यात आले आहे. दररोज निघतो २०० टन (टीडीपी) कचरा
Source link
शहरात लोकसहभागाने हवेची गुणवत्ता समाधानकारक:सिंगल युज प्लास्टिक विरोधात महापालिका कठोर