![]()
घरगुती गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापराबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात एक स्तुत्य पाऊल उचलण्यात आले आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व गॅस वितरण वाहनांवर (डिलिव्हरी व्हॅन्स) “भाई आया रे गॅस सिलिंडर’ हे विशेष सुरक्षा गीत अनिवार्यपणे वाजवले जाणार आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि इंडियन ऑईल (आयओसीएल) च्या क्षेत्रीय व्यवस्थापकांना आवश्यक कार्यवाही करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.‘ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन’ या संस्थेने जनहितार्थ या विशेष सुरक्षा गीताची निर्मिती केली आहे. देशात दरवर्षी गॅस सिलिंडरशी संबंधित अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. सिलिंडर घेताना होणारा निष्काळजीपणा आणि माहितीचा अभाव ही यामागची मुख्य कारणे आहेत. या गंभीर विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आणि दुर्घटना टाळण्यासाठी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक नितीन सोळंके यांनी प्रशासनाकडे सिलिंडर घरपोच देणाऱ्या वाहनांवर हे गीत वाजवण्याचा प्रस्ताव सादर केला होता.या सुरक्षा गीताचे औपचारिक प्रकाशन पद्मश्री डॉ.विलास डांगरे, रामटेकचे खा. श्यामकुमार बर्वे आणि जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष सचिन शिंपी यांच्या उपस्थितीत झाले आहे. एलपीजी गॅस सिलिंडर डिलिव्हरी करणाऱ्या वाहनांवर हे गीत वाजवल्याने सामान्य नागरिक एलपीजी सुरक्षेबाबत अधिक जागरूक होतील. या गीताच्या माध्यमातून सिलिंडरचे वजन तपासणे, सिलिंडरचे सील तपासणे आणि विविध सुरक्षा मानकांची माहिती थेट प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.जनहित आणि नागरिकांची सुरक्षा सर्वोच्च स्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावावर तत्काळ पावले उचलली आहेत. जिल्हा उर्वरित. पान ४ जिल्ह्यात प्रथमच एलपीजी सिलिंडरच्या सुरक्षेसाठी जनजागृती केली जात आहे. घरगुती वापराचे गॅस सिलिंडर हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतानाही आजवर ते सिलिंडर घेऊन येणाऱ्याकडून कसे तपासून घ्यायचे, त्याचा वापर कसा करायचा, त्याचे वजन किती याबाबत माहिती करून घ्यायची तसदी कोणीही घेत नव्हते. त्यामुळे सिलिंडर घरपोच आले की, त्याचे पैसे चुकवून ते ठेऊन घ्यायचे एवढीच तसदी सर्वसामान्य घेत होतो. मात्र, गीताच्या माध्यमातून होणाऱ्या जनजागृतीमुळे निश्चितच एलपीजी सिलिंडर सुरक्षितपणे वापरण्याची सवय नागरिकांना लागेल. सिलिंडर सुरक्षेसाठी जागृती
Source link
"भाई आया रे गॅस सिलिंडर’ गीत वाजणार:जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश, सुरक्षित वापराची सवय लागणार