![]()
तब्बल 200 वर्षे पूर्ण करणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्सने आपल्या निष्ठावान कर्मचाऱ्यांचा कार आणि दुचाकी दैऊन विशेष सन्मान केला. सध्या चंदुकाका सराफ ज्वेल्स सुवर्णपेढीने पुण्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकात आपल्या शाखांचे जाळे विस्तारले असून लवकरच मध्यप्रदेशातील खांडवा येथे सुवर्णपेढीचे नवीन दालन सुरू होणार आहे. दोनशे वर्षांपूर्वी प्रज्वलित केलेली विश्वासाची एक छोटीशी ज्योत आज ‘चंदुकाका सराफ ज्वेल्स’ या भव्य वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. या वटवृक्षाच्या सावलीत असंख्य कुटुंबांच्या आठवणी जपल्या गेल्या आहेत. हजारो नात्यांची ऊब अनुभवली आहे आणि प्रत्येक दागिन्यामागे विश्वासाची एक अनमोल कहाणी विणली गेली आहे. सन 1827 मध्ये सुरू झालेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्सने दोन शतकांचा हा गौरवशाली प्रवास पूर्ण केला. याच अविरत विश्वासाचा, ग्राहकांशी जपलेल्या अतूट नात्याचा आणि दोनशे वर्षांच्या समृद्ध वारशाचा भव्य जल्लोष आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आला. दोनशे वर्षांची परंपरा, वर्तमानातील आधुनिकता आणि भविष्यातील नवी स्वप्ने यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा संस्था कितीही मोठी होत गेली, तरी तिची खरी उंची तिच्यासोबत निष्ठेने चालणाऱ्या माणसांमुळेच ठरते. चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या दोनशे वर्षांच्या गौरवशाली प्रवासात संस्थेसाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या निष्ठावान कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार आणि दुचाकी, तर इतर कर्मचाऱ्यांना चांदीच्या वस्तू भेट देऊन त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यात आला. काळ बदलला, विश्वास कायम चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक अतुल शहा म्हणाले, “काळ बदलला, पिढ्या बदलल्या, दागिन्यांची रूपे बदलली; पण चंदुकाका सराफ ज्वेल्सवरील विश्वास मात्र बदलला नाही. दोनशे वर्षांचा हा प्रवास केवळ आमचा नाही, तर आमच्या ग्राहकांचा आणि आमच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा आहे.” नाविन्यपूर्णतेची ओळख निर्माण करणार पुढील वाटचालीबद्दल बोलताना संचालक सिद्धार्थ शहा यांनी सांगितले, “दोनशे वर्षांची शुद्धता आणि विश्वासाची परंपरा आम्ही पुढे नेणारच; मात्र आता उत्तम आणि नाविन्यपूर्ण दागिन्यांसाठीही चंदुकाका सराफ ज्वेल्सची स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे. पुढील दोनशे वर्षांसाठी हीच आमची बांधिलकी आहे.” व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर तसेच, “सिस्टीम अब आपकी मुठ्ठी में” हा दृष्टिकोन मांडत संचालक आदित्य शहा यांनी व्यवसायामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला. बदलत्या काळानुसार ग्राहकांना अधिक सुलभ, वेगवान आणि ग्राहकाभिमुख सेवा कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील, याबाबतचा मानस त्यांनी उपस्थितांना बोलून दाखवला. या ऐतिहासिक सोहळ्यास संचालक अतुल शहा आणि संगीता शहा यांच्यासह आदित्य शहा, दामिनी शहा, सिद्धार्थ शहा आणि अंकिता शहा उपस्थित होते. तसेच कर्मचारी, कुटुंबीय, हितचिंतक आणि सहकाऱ्यांनी एकत्र येत या सुवर्णक्षणाला आणखी खास बनवलं.
Source link
चंदुकाका सराफ ज्वेल्सचे 200 वर्षे पूर्ण:निष्ठावान कर्मचाऱ्यांचा कार आणि दुचाकी देऊन केला विशेष सन्मान; आता मध्यप्रदेशातील खांडवात नवीन दालन!