![]()
पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावर नेकलेस गार्डनजवळ एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. वीरेंद्र द्विवेदी असे त्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून, पोलिसांनी अपघातग्रस्त इनोव्हा कार (एमएच १२ – वायएस ०६२२) जप्त केली आहे. वीरेंद्र द्विवेदी हे नियमितपणे पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात धावण्याचा व्यायाम करत होते. याचवेळी एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. या धडकेत द्विवेदी गंभीर जखमी झाले. ज्या कारने त्यांना धडक दिली, त्याच कारमधून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, अपघात नेमका कसा घडला, कारचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण का सुटले, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेली कार ‘ब्ल्यूरेज डेव्हलपर्स’ या कंपनीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. वाहनाच्या नोंदणीशी संबंधित पत्ता ‘एबीआयएल हाऊस’ असा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कारचालक पुण्यातील एका नामांकित बिल्डरचा मुलगा असल्याची चर्चा आहे. मात्र, चालकाची ओळख आणि या दाव्याची अधिकृत पुष्टी पोलिसांनी अद्याप केलेली नाही. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासणे, वाहनाचा वेग आणि चालकाची वैद्यकीय तपासणी यासह अन्य बाबींचा तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. यवतमाळमधील फुलसावंगी यात्रेत आकाश पाळण्यात थरार: महिलेचे केस बेरिंगमध्ये अडकले अन् डोक्याची चामडी निघाली, प्रकृती गंभीर सणासुदीच्या काळात यात्रेचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर अत्यंत भयंकर प्रसंग ओढवल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील यात्रेत आकाश पाळण्यात बसलेल्या एका महिलेचे केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने अवघ्या काही सेकंदात या महिलेचे केस जोराने खेचले गेले आणि केसांसह त्यांच्या डोक्याची चामडीच उपटून निघाली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना कशी घडली? फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी तान्हा पोळ्याच्या निमित्ताने मोठी यात्रा भरली होती. या यात्रेचा आनंद घेण्यासाठी बाली मारोती टाळीकोटे या महिला आल्या होत्या. त्या यात्रेतील आकाश पाळण्यात बसल्या. पाळणा वेगाने गोल फिरत असताना अचानक त्यांचे केस पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. वेगवान चक्रामुळे त्यांचे केस थेट मशीनमध्ये जोराने ओढले गेले. क्षणाचाही विलंब न होता, केसांसोबत त्यांच्या डोक्याची त्वचा (चामडी) अक्षरशः उपटून निघाली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.
Source link
कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू:पाषाण-बावधन रस्त्यावर घडली घटना, कार बिल्डरच्या कंपनीच्या नावावर