![]()
जागतिक घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता छत्रपती संभाजीनगरच्या दळणवळण क्षेत्राला बसला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एव्हिएशन टर्बाईन फ्युएलचा तुटवडा निर्माण झाला आहे. या इंधन संकटाचे सावट स्थानिक विमानसेवेवर पडले असून, इंडिगो एअरलाइन्सने गोवा आणि हैदराबाद ही दोन महत्त्वाची विमाने रद्द केल्यानंतर आता एअर इंडियानेही १ जुलैपासून दिल्लीची सकाळची विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दीड लाख कोटींची औद्योगिक गुंतवणूक असलेल्या या शहराच्या विकासाला धक्का बसला आहे. शिल्लक असलेली ६ विमानांमधून अजून अनेक विमाने रद्द होण्याची शक्यता आहे. एक शहर एक विमानसेवा या सूत्रावर आले तर मुंबईला एकच विमान सुरू ठेवण्यावर विचार होऊ शकतो. तेव्हा ही धोक्याची घंटा आहे. इंडिगोने विमानतळ संचालकांना दिलेल्या पत्रानुसार, आगामी १६ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत हैदराबाद आणि गोव्यासाठीची विमानसेवा पूर्णपणे स्थगित राहील. ऐन पर्यटनाच्या आणि व्यावसायिक गर्दीच्या हंगामातच ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. आता एअर इंडियाने नवी दिल्लीसाठीची सेवा १ जुलैपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
विमानांची संख्या आली १९ वरून आता ६ वर एकेकाळी चिकलठाणा विमानतळावरून दररोज १९ विमाने उड्डाणे घेत होती. कोरोनानंतर ही संख्या आधी १४ नंतर १२ आणि ९ वर आली. आता इंडिगोच्या या निर्णयामुळे शहराच्या पदरात केवळ ६ विमाने शिल्लक राहिली आहेत. अहमदाबाद,गोव्यानंतर दिल्लीलाही फटका यापूर्वी लखनऊ, नागपूर आणि अहमदाबाद सेवा बंद केली होती. जयपूरचे वेळापत्रक जाहीर करूनही सेवा सुरू झाली नाही. आता गोवा आणि हैदराबादच्या दुपारच्या सत्रातील सेवांवरही कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. आता एअर इंडियाने दिल्ली सेवा बंदचा निर्णय घेतला. युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामामुळेच सर्वकाही जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात विमानसेवा आपल्या उड्डाणांमध्ये कपात करीत आहे. देशात इंडिगो संकटानंतर कंपनीने सेवेत कपातीचे धोरण अवलंबले. आता एव्हीएसन टर्बाइन फ्युएलमुळे नवीन संकट उभे राहिले आहे. छत्रपती संभाजीनगरला एकाच शहराशी असलेल्या दोन सेवांमध्ये कपात केली जात आहे. सेवा बहालीसाठी प्रयत्न सुरू आहेत. -सुनीत कोठारी चेअरमन, नागरी विमान वाहतूक समिती, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन. उद्योगांना ब्रेक, पर्यटन क्षेत्राचे कंबरडे मोडणार छत्रपती संभाजीनगर ही राज्याची पर्यटन राजधानी असण्यासोबतच एक प्रमुख उद्योगनगरी आहे. अलीकडच्या काळात शहरात तब्बल दीड लाख कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. अशा स्थितीमध्ये दळणवळण व्यवस्था मजबूत होणे गरजेचे असताना, विमानसेवा मात्र सातत्याने आक्रसत चालली आहे. याकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे.
Source link
गोवा, हैदराबादनंतर आता दिल्लीचे विमान बंद:1 जुलैपासून निर्णय, उरल्या 6 फ्लाइट; एव्हिएशन टर्बाइन फ्युएल टंचाईचा परिणाम