Headlines

आदित्य चौधरी 25 व्या वर्षी बनला गॅझेटेड ऑफिसर:‘एमपीएससी’तून ‘ड्रग इन्स्पेक्टर''पदी निवड; क्रीडा कोट्यातून राज्यात प्रथम‎




माजी प्राचार्य स्व. गजानन चौधरी यांचा मुलगा आदित्य चौधरी हा एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन गॅझेटेड अधिकारी बनला आहे. त्याची ड्रग इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे. या परीक्षेत क्रीडा कोट्यातून तो राज्यात प्रथम आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या ‘ड्रग इन्स्पेक्टर’ पदाच्या परीक्षेत आदित्यने घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे क्रीडा कोट्यातून तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आहे. अवघ्या २५ व्या वर्षी गॅझेटेड अधिकारी म्हणून त्याची होणारी ही नियुक्ती त्याच्या अथक परिश्रमाची आणि जिद्दीची पावती आहे. आदित्य चौधरी हा अत्यंत अभ्यासू, ध्येयवेडा, एकाग्र स्वभावाचा तरुण आहे. त्याने बॅचलर ऑफ फार्मसी पूर्ण केल्यानंतर प्रतिष्ठित सीओईपी, पुणे येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्याने स्वतःच्या अभ्यासावर पूर्ण विश्वास ठेवला. स्वअभ्यासाच्या बळावर त्याने हे दैदिप्यमान यश मिळवले आहे. मुलाखतीमध्येही त्याने उत्कृष्ट गुण मिळवले. त्याने आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. त्याच्या प्रवासात माजी प्राचार्य स्व. गजानन चौधरी यांनी त्याला योग्य मार्गदर्शन दिले. त्यांनी आवश्यक सुविधा दिल्या. त्यांनी उत्तम संस्कार दिले. मुलामध्ये आत्मविश्वास, शिस्त, मेहनतीची सवय त्यांनीच रुजवली. वडिलांच्या अकाली निधनाच्या वेळी आदित्य शिक्षणासाठी बाहेर होता. वडिलांच्या जाण्याचे दुःख मनात असतानाही त्याने खचून न जाता त्यांच्या स्वप्नपूर्तीलाच आपले ध्येय मानले. त्याने संपूर्ण ताकदीने अभ्यास केला. आज त्याने हे यश मिळवले आहे. वडिलांचे आयुष्यभर जपलेले स्वप्न साकार संपूर्ण प्रवासात आदित्यची आई अर्चना गजानन चौधरी या खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहिल्या, त्याला प्रत्येक टप्प्यावर आधार दिला. अर्चनाताई मुलगा आदित्य याच्यासाठी हिरकणीसारख्या उभ्या राहिल्या. त्यांच्या त्याग, संयम आणि विश्वासाला आज हे यश तितकेच समर्पित आहे. आदित्यने केवळ परीक्षा उत्तीर्ण केली नाही, तर आपल्या वडिलांचे आयुष्यभर जपलेले स्वप्न साकार केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *