![]()
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगणना व घरयादीचे कामकाज यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. या कालावधीत ४ जूनला खामगावपर्यंत तालुक्यातील १४९ गावात एकूण ३७८ हाऊस लिस्टिंग ब्लॉक (HLB) मधील कामकाज १०० टक्के पूर्ण करण्यात
.
भारत सरकारच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत घरगणना व घरयादी (House Listing & Housing Census) हा अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत टप्पा असून या टप्प्यामध्ये देशातील प्रत्येक घर, कुटुंब व निवासस्थानांची अद्ययावत माहिती संकलित केली जाते. या माहितीच्या आधारे शासनाच्या विविध विकास योजनांचे नियोजन, निधी वाटप तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी केली जाते. जनगणना २०२७ अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या विशेष मोबाइल ॲपच्या माध्यमातून नियुक्त प्रगणकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण केले.
घरगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांना घर, कुटुंब, सामाजिक, आर्थिक व इतर बाबींशी संबंधित एकूण ३३ प्रश्न विचारण्यात आले. प्राप्त माहिती अचूकपणे मोबाईल ॲपमध्ये नोंदवून डिजिटल पद्धतीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सदर कामकाज प्रभावीपणे पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व प्रगणकांना पूर्वप्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये मोबाईल ॲपचा वापर, माहिती संकलन पद्धती, माहितीची अचूकता आणि जनगणनेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून सर्व प्रगणकांनी अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे काम करून घरगणना यशस्वीरित्या पूर्ण केली.
ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तथा चार्ज अधिकारी सुनील पाटील आणि निवासी नायब तहसीलदार तथा अतिरिक्त चार्ज अधिकारी सोनाली भाजीभाकरे यांनी सातत्याने आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन व समन्वय साधत परिश्रम घेतले.
तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे कामगिरी
^जनगणना (Census) म्हणजे देशातील किंवा प्रदेशातील लोकांची पद्धतशीरपणे केलेली शिरगणती. खामगाव तालुक्यातील सर्व पर्यवेक्षक, प्रगणक, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली आहे. जनगणनेच्या पुढील टप्प्यांमध्येही नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी – सुनील पाटील , तहसीलदार खामगाव