![]()
अनियमित पावसाचा मोठा फटका हत्तीकणबस, सलगर, मैंदर्गी परिसरातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना बसला आहे. पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटला असून, उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने हत्तीकणबसचे बसवराज बिराजदार या शेतकऱ्याने ४ एकर सूर्यफुलावर नांगर फिरवली आहे. पेरणीपासून आतापर्यंत बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत तसेच मजुरीवर मोठा खर्च करूनही पिकांना आवश्यक वेळी पुरेसा पाऊस मिळाला नाही. परिणामी सूर्यफूल, सोयाबीन, उडीद आदी पिकांची वाढ समाधानकारक झालेली नाही. काही ठिकाणी उत्पादनातून पेरणीचा खर्चही भरून निघणार नसल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. विशेषतः सूर्यफूल, सोयाबीन पिकाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अपेक्षित उत्पादनाची शक्यता नसल्याने काही शेतकऱ्यांवर उभे पीक सोडून देण्याची, तर काहीवर नांगर किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने पीक काढून टाकण्याची वेळ आली आहे.
Source link
पाऊस नसल्याने सूर्यफुलावर फिरवला नांगर:हत्तीकणबसमधील शेतकऱ्यांने पाऊस नसल्याने खरीप पीक जमिनीत गाढले