Headlines

निराधार महिलेला मिळाला माणुसकीचा आधार:नंददीप फाउंडेशनच्या निवारा केंद्रात सुरक्षित आश्रय; प्रशासनाकडून कुटुंबीयांचा शोध सुरु



मागील अनेक दिवसांपासून चांदूर रेल्वे शहरात अत्यंत दयनीय आणि बेवारस स्थितीत जीवन जगणाऱ्या एका अज्ञात महिलेच्या मदतीसाठी मैत्री फाऊंडेशन व आझाद नवदुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत माणुसकीचे दर्शन घडवले. रस्त्यावर व कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ अन्

.

महिलेची दयनीय अवस्था लक्षात येताच मैत्री फाऊंडेशनचे अंकुश जोशी यांनी पुढाकार घेत नंददीप फाउंडेशनशी संपर्क साधला. त्यानंतर मैत्री फाऊंडेशनचे अंकुश जोशी, सनी जोशी, विकी राय, प्रशांत भैसे, अब्दुल राजीक, हर्षल वाघ तसेच आझाद नवदुर्गा मंडळाचे राजू कलावटे, पिंटू पतारिया, पराग वाघ, मंगेश चोरे, सोनू सातपुते, बबलू वैद्य यांनी या सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतला. नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे, अविनाश धनेवार, विजय कुलरकर, दिलीप हजारे, मुरलीधर गबने आणि विशाल काकडे यांच्या सहकार्याने महिलेला सुरक्षितपणे नंददीप फाउंडेशनच्या निवारा केंद्रात नेण्यात आले.

या संपूर्ण कार्यात चांदूर रेल्वे पोलिसांनीही आवश्यक ती पोलीस प्रक्रिया पूर्ण करून सहकार्य केले. तसेच मैत्री फाऊंडेशनच्या वतीने सेवेसाठी आलेल्या टीमच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली.

निवारा केंद्रात पोहोचल्यानंतर महिलेची स्वच्छता करून तिला आंघोळ घालण्यात आली. केस कापण्यात आले. स्वच्छ कपडे देण्यात आले. महिला असल्याने नंदिनी शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत तिची स्वच्छता व आंघोळ करून दिली. अनेक दिवसांपासून उपेक्षित अवस्थेत असलेल्या या महिलेला पुन्हा सन्मानाने जगण्याचा आधार मिळाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *