Headlines

321 विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती:राजेश्वर युनियन हायस्कूलचा 22 वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम, विद्यार्थ्यांसह मान्यवरांची उपस्थिती‎



अमरावती-बडनेरा महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद, अमरावती यांच्या सूचनेनुसार राजेश्वर युनियन हायस्कूल, बडनेरा येथील स्काऊट-गाईड, पर्यावरण मंडळ विभाग, लायन्स क्लब अमरावती प्राईड आणि राजनंदिनी स्मृती फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्

.

शाळेतील शिक्षक तथा स्काऊटर संदीप अंबाडकर, विज्ञान शिक्षिका माधवी ठाकरे, मोहन खानंदे व प्रणाली विदवांस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गणेशमूर्तींना विविध रंगछटा देत आपले कलागुण सादर केले. यामध्ये दुपार विभागातून आर्या संजय सुने, सृष्टी विलास साखरे, अनन्या दिलीप फाटे, निर्मल योगेश भगत व निधी राजेश सुपारे, तर सकाळ विभागातून आराध्या रवी अंभोरे, चारू कुणाल जैन, श्रेयस पवन तायडे, वंशिका कमलेश रोतडे व श्रावणी प्रशांत सरडे यांनी उत्कृष्ट गणेशमूर्ती रंगवून पारितोषिक पटकावले. सर्व पारितोषिके लायन्स क्लब, अमरावती प्राईड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली.

या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सत्येन राघोर्ते, उपमुख्याध्यापिका नीता गहरवाल, ज्येष्ठ पर्यवेक्षिका मनीषा राऊत व पर्यवेक्षिका नीलिमा कांडलकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील कलाशिक्षक मोतीराम सैरिसे, अनिता मुगल, सुषमा कोठीकर, कृपेक्षा लांडोरे, अमृता मेहकरे व शिल्पा क्षार यांनी गणेशमूर्तींचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक वर्गातून कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाला लायन्स क्लब इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभियंता विलास साखरे, लायन्स क्लब अमरावती प्राईडच्या अध्यक्षा किरण साखरे, मनीष टाले, नेहा टाले, सुरेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रम प्रमुख संदीप अंबाडकर यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन शिक्षिका प्रणाली विदवांस यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *