Headlines

दादरमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात, CCTV फुटेज समोर:चालकाचे सुटले नियंत्रण, अनेक वाहनांना उडवले, एकाचा मृत्यू, तर अनेक जखमी




दादर येथील प्लाझा टॉकीज आणि कोतवाल उद्यान परिसरात आज सकाळी बेस्टच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू असून अनेक जण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस धारावीहून दादरच्या दिशेने येत होती. सकाळी सुमारे ९.१५ ते ९.४५ वाजण्याच्या दरम्यान कोतवाल गार्डन चौकाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने प्रथम एका ट्रेलरला धडक दिली आणि पुढे कार, दुचाकी तसेच अन्य वाहनांना धडक देत पुढे गेली. या अपघातात एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून इतर काही वाहनांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाहा अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज घटनेनंतर मोठी वाहतूक कोंडी घटनेची माहिती मिळताच पोलिस, वाहतूक विभाग आणि बेस्ट प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर दादर टीटी, प्लाझा टॉकीज आणि कोतवाल गार्डन परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे काही काळ वाहनांची वाहतूक संथ गतीने सुरू होती. दरम्यान, अपघातग्रस्त बस ही इलेक्ट्रिक बेस्ट बस असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांत अशा बसांच्या अपघातांच्या घटना समोर आल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *