Headlines

करिअर निवडताना वेगळ्या पर्यायांचा विचार करावा:पुरातत्वशास्त्र अभ्यासिका गिरीजा दुधाट यांचे मत, दहावी बारावीतील गुणवंतांना मार्गदर्शन‎



दहावीनंतर पुढे काय करायचे याचा पालक आणि विद्यार्थी यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. करियरसाठी पुरातत्वशास्त्र हा उत्तम पर्याय व वेगळा पर्याय आहे. मी स्वत: पुरातत्व विज्ञान या शाखेकडे जायचे ठरवले असताना माझ्या कुटुंबातील प्रत्येकाने पाठिंबा दि

.

अहिल्यानगर ब्राह्मण बिझनेस वेलफेअर नेटवर्क असोसिएशन (बीबीएन) आयोजित दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गिरिजा दुधाट बोलत होत्या. यावेळी विक्री कर अधिकारी श्रीनिवास श्रोत्री, प्रा. आशीष तट्टू, विश्वस्त निखिल कुलकर्णी, शिल्पा सोमणी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितीत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात अमित काळे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून गिरिजा दुधाट यांनी पुरातत्वशास्त्राचे महत्व सांगितले. त्या म्हणाल्या, करियरसाठी पुरातत्वशास्त्र हा वेगळा विषय निवडण्यासाठी आपल्या मधील कौशल्ये विकसित करावी लागतात. पुरातत्व शास्त्राचा आवाका फार मोठा असून या विषयासोबत इतिहास, भूगोल, भूगर्भशास्त्राचा देखील अभ्यास करावा लागतो. इतिहास हा विषय मानवलिखित आणि कालमापनानुसार घडलेल्या घटनांचा अभ्यास असतो तर पुरातत्वशास्त्रात काही हजार वर्षांपूर्वीच्या घटना, विविध स्थित्यंतरे आणि मानवी उत्क्रांती, विविध संस्कृती याचा सखोल अभ्यास होतो. अनेक भाषा, संदर्भ, जगभरात झालेले काम या सगळ्यांचा ताळमेळ लावावा लागतो. कालानुरूप एआयचा वापर करणे अत्यावश्यक आहे. वाचनाबरोबरच सूक्ष्मपणे अभ्यास करणे या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अति महत्त्वाचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *