![]()
उद्धव ठाकरेंना नेतृत्व करता येत नाही आणि आदित्य ठाकरे घरात बसून आहेत उबाठाचे अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे, अशी भूमिका संजय राऊत घेतील. उबाठाचे लोकसभेचे 9 आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे 10 खासदार वेगवेगळ्या पक्षात जाणार आहेत. काही जण संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसमध्ये जातील तर काही जण शिंदेंचे नेतृत्व स्वीकारतील, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, न्यायाधीश आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेणे ही न्यायव्यवस्थेची नियमित प्रक्रिया आहे. काँग्रेसच्या काळात सुद्धा हे होत होते. उद्धव ठाकरे पहलगाम हल्ल्यानंतर कुठे होते, याचे उत्तर राऊतांनी द्यावे, ते त्यावेळी लंडनवारीमध्ये मजा करत होते त्यावर राऊतांनी बोलले पाहिजे. उबाठा-राष्ट्रवादी संपवण्याची राऊतांनी सुपारी घेतली नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांच्या पोटात आहे ते ओठांवर यायला लागले आहे. त्यांनी आज सांगितले की तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे. येणाऱ्या काळात राऊत असेही म्हणतील की उबाठाचे अस्तित्व संपत आले आहे ते टिकण्यासाठी त्यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे. संजय राऊत यांनी काँग्रेसकडून उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याची सुपारी घेतली आहे. येणाऱ्या काळात केवळ काँग्रेसच पक्ष जिंवत राहिला पाहिजे ही सुपारी राऊतांनी राहुल गांधींकडून घेतली आहे. तृणमूलचे नेते ममतांच्या दहशतीला कंटाळले नवनाथ बन म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे नेते ममता बॅनर्जी यांच्या दहशतीला कंटाळले आहेत. म्हणून त्यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. तो येणाऱ्या काळात आपली वेगळी भूमिका मांडणार आहे. राऊतांनी आपल्याकडे लक्ष दिले पाहिजे. संजय राऊत नारी सन्मानाबद्दल बोलूच नका. तुमच्या हातात जनतेने घंटा दिला आहे. नारी सन्मानाबद्दल तुम्ही बोलू नका, तुम्ही महिलांना शिवीगाळ करता आणि तुम्ही महिलांच्या सन्मानावर बोलू नका तो अधिकार तुम्हाला नाहीच. आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध- आमदार पाटील आमदार शिवाजी पाटील म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग झाला तर आमचा मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळू शकते. म्हणून आमचा या महामार्गाल पाठिंबा आहे. आमचा भाग अजूनही दुर्लक्षित आहे, काँग्रेसच्या काळात काहीच विकास आमच्या भागात झाले नाही. या महामार्गामुळे आमचा भाग विकसित होऊ शकेल. 60 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होणार असा आरोप करणाऱ्या लोकांनी या रस्त्याचे काम घ्यावे आणि कमाई करावी. विरोधकांनी केवळ देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करू नये.
Source link
उबाठा संपवण्याची स्क्रिप्ट तयार:राऊत राहुल गांधींची सुपारी घेऊन उबाठा-पवार गट संपवण्याच्या मोहिमेवर- नवनाथ बन