Headlines

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुलभ:महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त स्कायवॉक; मेट्रो, मोनोरेल आणि लोकल एका छताखाली




मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम आणि प्रवाशांसाठी अखंड बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महालक्ष्मी मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच मेट्रो-3, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वे स्थानकांना जोडणारा देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त स्कायवॉक मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याबाबतची माहिती एमएमआरडीएने त्यांच्या सोशल मीडियावर हँडलवरून दिली आहे. या प्रकल्पामुळे संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक, मेट्रो-3 आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानक यांच्यातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. सध्या विविध वाहतूक साधनांमध्ये बदल करताना लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात खर्ची पडतो. मात्र, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा सुमारे 20 मिनिटांचा वेळ वाचणार असून दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातून मोनोरेलपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वापरालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये अभियांत्रिकीचे आव्हान यशस्वीपणे पेलले महालक्ष्मी परिसरातील भूमिगत पायाभूत सुविधांमुळे हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक मानला जात होता. पायाभरणीपूर्वी 1,800 मिमी व्यासाची पावसाच्या पाण्याची वाहिनी सुरक्षितरीत्या स्थलांतरित करण्यात आली. तसेच पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्यांना कोणतीही हानी न पोहोचवता संपूर्ण काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे बांधकामादरम्यान नागरिकांना मूलभूत सेवांमध्ये कोणताही अडथळा आला नाही. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी एकही झाड तोडण्यात आलेले नाही. वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने संपूर्ण बांधकामकाळात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. तसेच साने गुरुजी मार्गावरील वार्षिक गणेश विसर्जन मिरवणुकांनाही कोणताही अडथळा निर्माण होऊ दिला गेला नाही. एकात्मिक वाहतूक व्यवस्थेकडे आणखी एक पाऊल एमएमआरडीएच्या या प्रकल्पामुळे मुंबईतील मेट्रो, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वे यांच्यातील दळणवळण अधिक अखंड होणार आहे. विविध वाहतूक साधनांमध्ये जलद बदल करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचेल, गर्दी कमी होईल आणि सार्वजनिक वाहतूक अधिक आकर्षक पर्याय ठरेल. त्यामुळे मुंबईच्या एकात्मिक वाहतूक व्यवस्थेला हा प्रकल्प महत्त्वाची बळकटी देणारा ठरणार आहे. हे ही वाचा… धावत्या लोकलमधून प्रवाशाला लाथ मारून खाली पाडले?:मुंबईत टीसीवर गंभीर आरोप, रेल्वे प्रशासनाच्या तपासणीत वेगळीच माहिती समोर मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मारामारी आणि वादाच्या घटना समोर येत असतानाच आता एका अजब आणि धक्कादायक प्रकरणामुळे मध्य रेल्वे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका तिकीट तपासनिसाने (TC) दंड भरण्यासाठी पैसे नसलेल्या विनातिकीट प्रवाशाला थेट धावत्या लोकलमधून लाथ मारून रुळांवर ढकलल्याचा खळबळजनक आरोप एका सहप्रवाशाने केला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने आरपीएफच्या ‘सीसीटीव्ही फुटेज’चा दाखला देत हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. सविस्तर वाचा… धर्मेंद्र प्रधानांनंतर आता ‘टोलकरी’ गडकरींचा राजीनामा घ्या:इथेनॉलमिश्रित इंधनाने वाहनांची वाट लावली – हर्षवर्धन सपकाळ नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षांनी आता आपला मोर्चा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वळवला आहे. “नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता ‘टोलकरी’ गडकरी यांचाही राजीनामा झालाच पाहिजे,” अशी जोरदार मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. इथेनॉलच्या मुद्द्यावरून आगामी काळात मोठा धमाका होण्याचे सूचक संकेत दिले आहेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *