Headlines

मुतारीजवळ अन्नाची साठवणूक, फ्रीजमध्ये रक्त:FDAची मुंबईत धडक कारवाई, नायर रुग्णालयाचे कॅन्टीन, ऑलिम्पियासह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित




सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या नामांकित हॉटेल्स तसेच अन्न आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत 16 सप्टेंबर रोजी धडक तपासणी मोहीम राबवून अन्न सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या तब्बल 7 प्रमुख आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित केले आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेच्या प्रसिद्ध नायर रुग्णालयाचे कॅन्टीन आणि कुलाब्यातील नामांकित ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस’चा समावेश असल्याने खवय्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. कुलाब्यातील ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस’मध्ये घृणास्पद प्रकार उघड मांसाहारी पदार्थांसाठी मुंबईकरांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या कुलाब्यातील ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस’बाबत ग्राहकांनी अनेक तक्रारी नोंदवल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन एफडीएच्या पथकाने तेथे अचानक छापा टाकला. त्यावेळी अधिकाऱ्यांना आढळलेली परिस्थिती अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक होती. पालिकेच्या नायर रुग्णालयातील कॅन्टीनवरही कारवाईची कुऱ्हाड मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्येही एफडीएच्या पथकाने तपासणी केली. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांच्या आरोग्यासाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे उघड झाले. नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा गंभीर धोका लक्षात घेऊन प्रशासनाने नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित केला आहे. परवाने निलंबित करण्यात आलेल्या 7 आस्थापनांची यादी कडक कायदेशीर कारवाई सुरू सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि अस्वच्छता रोखण्यासाठी एफडीएने संपूर्ण शहरात तपासणी पथके तैनात केली आहेत. परवाने निलंबित करण्यात आलेल्या सर्व संबंधित आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कडक कायदेशीर खटले भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कोणत्याही आस्थापनेची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. हेही वाचा… निकषांची वाट न पाहता राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा!:शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार द्या; शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र राज्यात पावसाने प्रदीर्घ काळ ओढ दिल्याने निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून तातडीच्या उपाययोजनांची आग्रही मागणी केली आहे. “शासनाने औपचारिक निकषांची वाट न पाहता गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये त्वरित दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची थेट आर्थिक मदत द्यावी आणि शेतमजुरांच्या खात्यात 25 हजार रुपये जमा करावेत,” अशा प्रमुख मागण्या पवारांनी या पत्राद्वारे केल्या आहेत. राज्यातील विविध शेतकरी संघटनांकडूनही दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या जोर धरत असताना शरद पवारांच्या या पत्रामुळे सरकारवरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *